नांदगाव रेल्वे स्टेशनजवळ पे्रमी युगुलाची आत्महत्त्या

By Admin | Updated: January 5, 2017 01:35 IST2017-01-05T01:35:22+5:302017-01-05T01:35:38+5:30

नांदगाव रेल्वे स्टेशनजवळ पे्रमी युगुलाची आत्महत्त्या

Parmi Yuigal suicide near Nandgaon railway station | नांदगाव रेल्वे स्टेशनजवळ पे्रमी युगुलाची आत्महत्त्या

नांदगाव रेल्वे स्टेशनजवळ पे्रमी युगुलाची आत्महत्त्या

 नांदगाव : रेल्वे स्टेशनजवळील सी कॅबिनजवळ असलेल्या लोहमार्गावर दोघांनी आत्महत्त्या केल्याची घटना आज सकाळी १० वाजेपूर्वी घडली. ही आत्मत्त्या नाजूक संबंधातील येणाऱ्या अडथळ्यामुळे झाली असावी, असा संशय रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे. तरुण अविवाहित असून, तो येवला तालुक्यातील कुसुमाडी येथील तर विवाहिता एरंडगाव येथील आहे. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास नाशिककडे जाणाऱ्या मालगाडीच्या खाली या दोघांनी स्वत:ला झोकून दिले. घटना कळताच बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी झाली होती. प्रेमसंबंधातून ही घटना घडली असावी, अशी चर्चा या घटनेनंतर होती. याबाबत अधिक माहिती अशी की, रेल्वेस्थानकाजवळील सी कॅबिनजवळ दोघा अज्ञात जोडप्याचे मृतदेह एका रेल्वेचालकाला दिसून आल्याने त्याने ही बाब रेल्वे पोलिसांना कळविली. रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यांनतर मृतदेह तपासले असता तरुणाच्या खिशात सापडलेल्या आधार कार्डावरून तो मृतदेह अमोल अशोक साठे, रा.कुसुमाडी, ता. येवला येथील एका रिक्षाचालकाचा असल्याची ओळख पटली. तर मृत तरुणीची ओळख सुरु वातीला होत नसल्याने त्या दृष्टीने तपास सुरु केला असता ती तरु णी विवाहित असून तिचे नाव रोहिणी राजेंद्र नेमाणे रा.एरंडगाव (ता. येवला ) असून, सध्या ती ठाणे येथे आपल्या पती सोबत राहत असल्याची माहिती तिच्या नातेवाइकांनी दिली.

Web Title: Parmi Yuigal suicide near Nandgaon railway station