नाशिक : डिप्रेशन म्हणजे शरीर आणि मन ह्यांचा एकमेकांशी असहयोग, काही अनपेक्षित, अप्रकृतिक मानसिक विचारांमुळे दोघांमध्ये तारतम्य रहात नाही आणि परिणमी(स्वरूप) शरीर आणि मनाच्या ऊर्जा प्रवाहात अडथळा निर्माण होतो.अश्या अवस्थेत रुग्णांमध्ये अत्याधिक थकवा, निर्जिवता, उदासीनता आणि भावनात्मक कमकुवतपणा हे लक्षणे दिसून येतात. डिप्रेशन म्हणजेच जगण्याचा नकारात्मक दृष्टीकोन आणि स्वत्वाशी अनुकूलन असमर्थता.जेव्हा ही अवस्था फक्त क्षणिक असते आणि ती थोड्या वेळाने आपोआप निघून जाते तर ती स्वाभाविक आहे, पण जर ही मनः स्थिती सातत्याने अस्तिस्त्वात असते तर परिणाम घातक सुद्धा होऊ शकतात. ही प्रतिकूलता विकृतीला जन्म देते. अश्या अवस्थेत रुग्ण स्वतःला समाज आणि कुटुंबापासून वेगळा करून घेतो आणि तीव्रवस्था मध्ये जगण्याला ही नाकारू शकतो.डिप्रेशन कमी करण्यामध्ये योगशस्त्राचे अवलंबन खूप प्रभावी ठरतो. डिप्रेशन च उपचार करण्यासाठी योग शास्त्र आपली भौतिक आणि मानसिक ऊर्जा संतुलीत करण्याचे कार्य करते.डिप्रेशन ची योगद्वारे चिकित्साचे चार मुख्य टप्पे आहेत.१. प्राणायाम२. योगासने आणि बंध३. षटकर्म.४.उचित आहार व जीवन शैली.
१. प्राणायाम हा डिप्रेशनच्या तीव्रावस्था मध्ये सुद्धा प्रभावी ठरतो.सर्वप्रथम रुग्णाला मैत्रीपुर्ण वातावरणात प्राणायाम साठी तय्यार करणे, पद्मासन मध्ये बसवून आधी दीर्घ श्वसन घ्यायला लावणे. रुग्णाचे चित्त (मन) थोडे शांत होईल, आत्ता नाडी शोधन प्राणायाम करून घेणे. जर उन्हाळा असेल तर शीतली प्राणायाम आणि हिवाळा असेल तर काळजी पूर्वक भस्त्रिका प्राणायाम करायला लावणे.आहे दोन ते तीन अवर्तने करून घेता यईल. आता ओंकार नाद करायला सांगणे ह्यात प्रथम *ओ* चा उच्चार दीर्घ असेल ह्याने गळ्यातील स्नायू कंपन होतीलआणि रुग्णाला थोडा बळ आणि सहजता प्राप्त होते. तत्पश्चात *ओ* चा उच्चार लघु असेल आणि *म* हे दीर्घ करून ओंकार नाद करून घेणे, ह्या कंपनाने टाळू आणि मस्तिष्क प्रभावित होतात आणि रुग्णाची तणाव आणि नैराश्य ची स्थिती नाहीसी होते. आता थोडा विश्राम आणि रुग्णाला शवासन मध्ये झोपायला सांगणे, त्याला शांत झोप येईल. ह्या प्रकियेचे परिणाम लगेच दिसून येतात, रुग्ण उठल्यावर लक्ष्यात येईल की डिप्रेशन ची तीव्रता निघून गेलेली आहे आणि त्याला सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जाणवतो आहे.मात्र हळू हळू अशाप्रकारे प्राणायामाचे सराव दिनचर्या चा एक भाग म्हणून करायला प्रवृत करायचं जेणेकरून दीर्घकाळ फायदे दिसून येतील.
३. षटकर्मप्राणायाम आणि योगासन ह्यांचा नियमित अभ्यास चालू झाले की डिप्रेशन चे तीव्र अवस्थेचे एपिसोड्स कमी होतात. आत्ता मात्र षटकर्म( नेती,धौती,बस्ती, नौली, कपालभाती आणि त्राटक) द्वारे शरीराचा शोधन आवश्यक ठरतो. शरीरात साचलेले दोष ह्या षट कर्म शोधनातून बाहेर काढले जातात.
४. उचित पोषकआहार आणि जीवन शैलीशरीर शुध्दीकरण नंतर मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य प्रस्थापित करण्यासाठी योग्य आहार, विचार, निद्रा आणि जीवन शैली साठी समुपदेशन सुधा योग शास्त्र मध्ये समाविष्ट आहे.ह्या तऱ्हेने योग शास्त्र डिप्रेशन वर आपल्याला विजय नक्कीच मिळवून देते.स्वस्थ संतुलित असा आहारआहारातील घटक द्रव्य आपल्या आवडीनुसार नाही तर आपल्या शरीरासाठी काय चांगलं आणि काय वाईट ह्या गोष्टीवर ठरवले पाहिजे. फक्त योग्य आहार निवडणेच पुरेसे नाही ,आपण ते कसं खातो, किती खातो, कधी खातो, कशा सोबत खातो....ह्या अन्नपान विधी चा ही विचार आवश्यक आहे.
- डॉ. प्रिती भरत त्रिवेदी, एम.डी. (आयुर्वेद) पी.जी.एफ.पी