शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या प्रकोपाने जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: March 30, 2017 22:55 IST

मालेगाव : शहर परिसरात गेल्या चार दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली आहे. आग ओकणाऱ्या सूर्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे

 मालेगाव : शहर परिसरात गेल्या चार दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली आहे. आग ओकणाऱ्या सूर्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मालेगावच्या पाऱ्याने चाळिशी पार केल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. गुरुवारचे तपमान ४२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले.मालेगाव शहर व परिसरात उष्णतेने व उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. पाच-सहा दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. तपमानाने तब्बल चाळिशी पार केली आहे. राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे तपमान मालेगावचे नोंदवले गेले आहे. याचा थेट परिणाम जनजीवनावर झाला आहे. ग्रामीण भागातही दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. सकाळपासूनच उन्हाचे चटके बसू लागले आहेत. दुपारच्या सत्रात सूर्य अक्षरश: आग ओकीत असतो. या उन्हामुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. दुपारच्या सत्रात सर्वच प्रमुख रस्ते निर्मनुष्य होत आहेत. शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील कामकाजावरही उन्हाचा परिणाम दिसून येत आहे. उन्हामुळे शासकीय कार्यालयांमधील गर्दी ओसरली आहे. शहर- परिसरातील शाळा-महाविद्यालयेही सकाळच्या सत्रात भरवली जात आहेत. विद्यार्थ्यांना घराबाहेर सोडण्यास पालक नकार देत आहेत. नागरिकही महत्त्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी शीतपेय व इतर उपाययोजनांचा आसरा घेतला जात आहे. शहरात रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी रसवंतीगृहे उभारण्यात आली आहेत. शहर परिसरातील झाडांचाही उन्हापासून बचाव करण्यासाठी उपयोग केला जात आहे. ग्रामीण भागातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे.उन्हामुळे शेतातील उद्योगधंदे बंद पडले आहेत. मजूर व शेतकरी उन्हामुळे दुपारच्या सत्रात काम करीत नाहीत. तसेच या कडक उन्हामुळे शेती शिवारातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीतही घट होत आहे. परिणामी नागरिकांना व जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. पाणीटंचाईचा सामना ग्रामीण भागातील जनतेला करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंतीची वेळ आली आहे. मेंढपाळांनाही मेंढ्यांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, उन्हापासून बचाव करण्यासाठी शहरातील रस्त्यांवर टोपी, उपरणे, गॉगल्स आदि वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. नागरिकांची खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. (प्रतिनिधी)