नाशिक : रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत शहर वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी (दि. १३) चारचाकी वाहनधारकांना सीट बेल्ट लावण्याबाबत प्रबोधन व्हावे, यासाठी चारचाकी वाहनांची रॅली आयोजित केली होती. यावेळी पथनाट्याच्या आधारे जनजागृती करण्यात आली.
वाहतुकीबाबत प्रबोधन होण्याच्या दृष्टीने निबंधलेखन, भविष्य वाचन याद्वारे शहर वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांपासून जनजागृती करीत नागरिकांचे लक्ष वेधले होते. दंड भरण्यापेक्षा नियमांचे पालन करा, असा संदेश देण्यात वाहतूक शाखा यशस्वी ठरली.
वाहतूक नियमांची पालन व्हावे, त्यादृष्टीने जनजागृती व्हावी म्हणून आज पोलिसांनी सीट बेल्ट रॅलीचे आयोजन केले. सीट बेल्ट वापरला तर अनेक अपघातात जीव वाचू शकतो. कायदेशीर जसे की विमा कंपनीकडे क्लेम करताना या नियमाचा काय उपयोग होऊ शकतो, याचे यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. सदर रॅली गोल्फ क्लब येथून सुरू झाली. एबीबी सर्कल, प्रसाद सर्कल, कॉलेज रोड, जुना गंगापूर नाका यामार्गे रावसाहेब थोरात सभागृह येथे रॅलीचे विसर्जन झाले. दरम्यान, शहर पोलिसांनी आज के. के. वाघ कॉलेज येथे अपघातानंतर करावयाची मदत या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यात तज्ज्ञ डॉक्टरांनी वेळेचे आणि मदतीचे महत्त्व पटवून दिले. (प्रतिनिधी)
सीट बेल्ट प्रबोधनासाठी वाहतूक रॅलीचे आयोजन
By admin | Updated: January 14, 2017 01:05 IST
सीट बेल्ट प्रबोधनासाठी वाहतूक रॅलीचे आयोजन
सीट बेल्ट प्रबोधनासाठी वाहतूक रॅलीचे आयोजन
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}