शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
3
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
4
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
5
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
6
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
7
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
8
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
9
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
10
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
11
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
12
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
13
अधिक मास २०२६: दहा पट अधिक पुण्य मिळवून देणारा पुरुषोत्तम मास; सुख-समृद्धीसाठी 'या' उपासना करा!
14
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
15
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
16
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
17
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
18
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
19
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
Daily Top 2Weekly Top 5

१२५० प्रस्तावांना आॅनलाइन मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 00:33 IST

नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या विभागाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी मिळूनदेखील या शिक्षकांचे पगार आॅफलाइनच दिले जात होते. या आॅफलाइन प्रक्रियेमुळे पगारास विलंब होत होता. नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांच्याकडे मागणी केली होती. यात या चार जिल्ह्यातील शिक्षकांच्या १२५० प्रस्तावास आॅनलाइन करण्यासाठी नितीन बच्छाव यांनी मान्यता देऊन हा प्रश्न मार्गी लावल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देआॅफलाइन प्रक्रियेमुळे पगारास होत होता विलंब

सिन्नर : नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या विभागाचे शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी मिळूनदेखील या शिक्षकांचे पगार आॅफलाइनच दिले जात होते. या आॅफलाइन प्रक्रियेमुळे पगारास विलंब होत होता. नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांच्याकडे मागणी केली होती. यात या चार जिल्ह्यातील शिक्षकांच्या १२५० प्रस्तावास आॅनलाइन करण्यासाठी नितीन बच्छाव यांनी मान्यता देऊन हा प्रश्न मार्गी लावल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यात उच्च माध्यमिकचे प्रस्ताव पुणे येथील परीक्षा आयुक्त तुकाराम सुपे यांनी, शालार्थ आयडी दिलेले प्रस्ताव विभागीय अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांनी तर शालार्थ आयडी दिलेले प्रस्ताव विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव बी.के. दहीफळे यांनी मंजूर केलेले शालार्थ आयडी प्रस्ताव शिक्षणाधिकारी नितीन उपासनी व नवनाथ औताडे यांनी मान्यता दिलेल्या प्रस्तावांना शिक्षण उपसंचालक म्हणून नितीन बच्छाव यांनी दिलेले शालार्थ आयडी अशा सर्व विभागातील १२५० शालार्थ आयडी आॅफलाइन होते. हे सर्व शालार्थ आयडी आता आॅनलाइन झाले असून, नाशिक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आनंद व्यक्त करीत आहे. हे सर्व मुख्याध्यापक संघाच्या प्रयत्नाचे यश असल्याचे एस. बी. देशमुख यांनी सांगितले.
मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेवर आॅनलाइन शालार्थ आयडी अपडेट करून आॅनलाइन पगार बिले काढण्याच्या सूचना नितीन बच्छाव यांनी दिल्या. तसेच प्लॅन व नॉन प्लॅन पगार बिले नॉन प्लॅनमध्ये आणण्याचे काम सध्या सुरू आहे. जानेवारी अखेरपर्यंत सर्व पगार बिले नॉन प्लॅनमध्ये येऊन सर्वच कर्मचाऱ्यांची पगार बिले एकाच वेळेस १ तारखेलाच देण्याचे आश्वासन नितीन बच्छाव यांनी मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाºयांना दिले.
२० टक्के अनुदानासाठी पात्र व अपात्र सर्वच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्रस्ताव पुणे येथे शिक्षण संचालकांकडे पाठविले असून, २० टक्के व पुढील टप्पा अनुदानासाठी मुख्याध्यापक संघाने संचालक व आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मुख्याध्यापक संघ आक्रमक असल्याचेही मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, कार्याध्यक्ष एस. बी. शिरसाठ, सचिव एस. बी. देशमुख, सुरेश शेलार यांनी सांगितले.

टॅग्स :Teachers Councilशिक्षक परिषदTeacherशिक्षक