जिल्ह्यात व्यापाऱ्यांकडून कांदा लिलाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 09:21 PM2020-10-15T21:21:45+5:302020-10-16T01:54:20+5:30

पिंपळगाव बसवंत : कांद्याने पाच हजार रु पयांचा टप्पा ओलांडताच पिंपळगाव व लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांच्या कार्यालय तसेच गुदामांवर ...

Onion auction closed by traders in the district | जिल्ह्यात व्यापाऱ्यांकडून कांदा लिलाव बंद

जिल्ह्यात व्यापाऱ्यांकडून कांदा लिलाव बंद

Next
ठळक मुद्देप्राप्तिकराच्या कारवाईचे पडसाद : ठिकठिकाणी कांदा दरात घसरण, शेतकरी संतप्त

पिंपळगाव बसवंत : कांद्याने पाच हजार रु पयांचा टप्पा ओलांडताच पिंपळगाव व लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांच्या कार्यालय तसेच गुदामांवर प्राप्तिकर विभागाने बुधवारी (दि.१४) तपासणीसाठी धडक मारताच गुरूवारी विंचूर व लासलगावी व्यापाºयांकडून कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले. पिंपळगाव शहरातही एका बड्या व्यापाºयाची चौकशी करण्यात आली. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव सुरळीत चालू होते. दरम्यान, या साºया प्रकारामुळे काद्यांच्या दरात प्रतिक्विंटल ४८० रु पयांची घसरण झाल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली.
प्राप्तिकर विभागाने बुधवारी निफाड व येवला तालुक्यातील बारा व्यापाºयांच्या कार्यालय आणि गुदामांवर धाड मारली. त्यामुळे लासलगाव व विंचूर येथे लिलाव बंद पहावयास मिळाला मात्र पिंपळगाव बाजार समितीत कांद्यांच्या भावात ४८० रूपयांची घसरण झाल्याची दिसून आली. प्राप्तिकर विभागाच्या कारवाईमुळे कांदा बाजारात खळबळ उडाली असून या व्यापाºयांचे धाबे दणाणले आहे.

कांदा भाव वाढण्याची आशा
उन्हाळ कांद्याची टंचाई जाणवू लागल्याने कांद्याने पाच हजारी पार केली. भविष्यात दर गगनाला भिडू नये यासाठी प्राप्तीकर विभागाने बुधवारी लासलगाव येथील १२ तर पिंपळगाव येथील एका कांदा व्यापाºयाच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. मात्र, उन्हाळ कांदा बाजारात दाखल होण्यास अजून दोन महिने अवकाश असल्याने कांदा टंचाई निश्चित होणार असल्याने भविष्यात कांद्याचे दर वाढणार असा विश्वास शेतकºयांमधून व्यक्त केला जात आहे. गुरुवारी पिंपळगाव बाजार समितीत कांद्याचे कमीत कमी २४०१ तर जास्तीत जास्त ५५०१ रूपये आणि सरासरी ४६५१ रुपये दर राहिले.

व्यापाºयांकडून कांद्यांचा साठा ?
व्यापाºयांनी कांद्यांचा साठा केल्याचा संशय प्राप्तिकर विभागाला आहे. त्यामुळे पिंपळगाव, लासलगाव येथील कांदा व्यापाºयांवर प्राप्तिकर विभागाने बुधवारी कारवाई करीत घरे, कार्यालये आणि गुदामांची झडती घेतली होती. कांदा व्यापाºयांच्या महिनाभरातील खरेदी-विक्र ी व्यवहारांची आयकर विभाग चौकशी करणार असून व्यापाºयांच्या कार्यालयांतील महत्वाची कागदपत्रे अधिकाºयांनी ताब्यात घेतल्याचे समजते.

कांदा टंचाई मुळे भाव वाढल्याने प्राप्तिकर विभाग व्यापाºयांच्या गुदाम व कार्यालयात तपासणी करत आहे. ते त्यांचे काम करत आहेत. दरात समतोल राखण्याचे काम कदाचित ते करत असावे. मात्र व्यापाºयांनी कांद्याची कोणतीही साठवणूक केली नाही त्यामुळे घाबरून जाण्यासारखे काही नाही.
- अतुल शहा , कांदा व्यापारी, पिंपळगाव बसवंत

केंद्राचा जीडीपी आधीच खाली आला आहे. त्यात कोरोनाच्या पाशर््वभूमीवर फक्त शेतकरीच मेहनत करून जनतेला अन्न, धान्य पुरवित आहे. आता कांदा टंचाईच्या काळात शेतकºयांना चार पैसे मिळत असतील तर आडकाठी आणण्याची काही गरज आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येईल, अशी भूमिका केंद्र आणि राज्य सरकारने घेऊ नये.
- दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बसवंत बाजार समिती

कांदा दराने अजून उच्चांक गाठू नये यासाठी प्राप्तीकर विभागाने तपासणी सुरू केली आहे. व्यापाºयांना घाबरविण्याचा हा प्रकार आहे. या तपासणी सत्रामुळे व्यापारी नाराज होण्याचीच शक्यता अधिक आहे.
- प्रकाश ठक्कर, कांदा व्यापारी, पिंपळगाव बसवंत

शेतकरी आधीच अस्मानी संकटातून वाटचाल करीत आहे. कांदा विक्र ीतून शेतकºयांच्या हातात चार पैसे येण्याची वेळ आली असताना तपासणीसत्रामुळे कांदा दरात घसरण होवून शेतकºयांना नुकसान होणार आहे.
- दिपक शिंदे, प्रगतशील शेतकरी, आहेरगाव

व्यापाºयांची तपासणी करत केंद्र सरकारने नव्या कृषी विधेयकांना स्वत:च हरताळ फासला आहे. निर्यात बंदी केली. कांद्याचे भाव कोसळले. परंतु देशांतर्गत मागणी मुळे पुन्हा कांद्याला थोडेसे भाव वाढू लागले. हे विस्कळीत करण्यासाठी व बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केंद्राचे हे उद्योग चालले आहेत. यात व्यापाºयांवर कारवाई करण्याचा आभास निर्माण केला असला तरी शेतकºयांचेच मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार हे निश्चित.
- संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

 

 

Web Title: Onion auction closed by traders in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.