टॅम्पो उलटून एक ठार; चार जखमी

By Admin | Updated: January 20, 2015 00:33 IST2015-01-20T00:30:06+5:302015-01-20T00:33:08+5:30

टॅम्पो उलटून एक ठार; चार जखमी

One killed in tango; Four injured | टॅम्पो उलटून एक ठार; चार जखमी

टॅम्पो उलटून एक ठार; चार जखमी

नाशिक : पिंपळगावजवळ रविवारी सायंकाळी टॅम्पो उलटून झालेल्या अपघातात मालेगाव तालुक्यातील सोनज टाकळी येथील दिनकर नानाजी वाघ हा बावीस वर्षीय तरुण ठार झाला असून, चार जण जखमी झाले आहेत़ यातील जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ टॅम्पोचालक दिनकर नानाजी वाघ हा रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास टेम्पो घेऊन जात असताना पिंपळगावजवळील जंगम ढाब्याजवळ टॅम्पो उलटून अपघात झाला़ यामध्ये कमलेश भाऊसाहेब निकम (१८, सोनज टाकळी), योगेश कृष्णा शेलार (उपेंद्रनगर), प्रसाद रामदास शेवाळे (१८, उपेंद्रनगर) व सागर प्रभाकर पाटील (२७, रायगड चौक) हे चौघे जखमी झाले़ या सर्वांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता टॅम्पोचालक दिनकर नानाजी वाघ याच्यावर उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले, तर उर्वरित चौघा जखमींवर उपचार सुरू आहेत़ या अपघाताची पिंपळगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: One killed in tango; Four injured