नाशिक : ग्रामीण पोलीस भरतीत सहभागी झालेल्या उमेदवारांना भरतीसंदर्भातील हरकतींसाठी एक दिवसाची मुदत वाढविण्यात आली आहे़ उमेदवारांना मंगळवार (दि़२४) सकाळी ११ वाजेपर्यंत या हरकती नोंदविता येणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सी़ एस़ देवराज यांनी प्रसिद्धिपत्रकान्वये दिली आहे़ मंगळवारी सकाळी ११ नंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नसून, त्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे़ या भरतीसंदर्भात ज्या उमेदवारांच्या हरकती असतील त्यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या आत त्या नोंदवाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}