अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 16:13 IST2018-12-11T16:13:23+5:302018-12-11T16:13:48+5:30
नाशिक : भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना जेलरोडवरील सैलानी बाबा चौकात सोमवारी (दि़१०) रात्रीच्या सुमारास घडली़ शांताराम रामदास विसपुते (७५, रा. जेलरोड, नाशिकरोड) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार
नाशिक : भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना जेलरोडवरील सैलानी बाबा चौकात सोमवारी (दि़१०) रात्रीच्या सुमारास घडली़ शांताराम रामदास विसपुते (७५, रा. जेलरोड, नाशिकरोड) असे अपघातातमृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शांताराम विसपुते हे सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जेलरोडच्या सैलानी बाबा चौकातून पायी जात होते. यावेळी भरधाव आलेल्या वाहनधारकाने त्यांना जोराची धडक दिली़ यामध्ये विसपुते यांच्या डोक्यास व शरीरास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ तर अपघातानंतर वाहनचालक फरार झाला़ या प्रकरणी संजय विसपुते यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़
या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.