शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
3
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
4
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
5
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
6
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
7
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
8
इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
9
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
10
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
11
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
12
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
13
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
14
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
15
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
16
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
17
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
18
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
19
Iran Israel War: इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
20
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले

जुने सिडको शॉपिंग सेंटर भागात रस्ताच व्यापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:55 IST

जुने सिडको भागातील शॉपिंग सेंटर येथे भाजीबाजारासाठी गाळे बांधण्यात आले असूनही मुख्य रस्त्यावर भाजीबाजार भरत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होऊन छोटे-मोठे अपघात होत आहेत.

जुने सिडको भागातील शॉपिंग सेंटर येथे भाजीबाजारासाठी गाळे बांधण्यात आले असूनही मुख्य रस्त्यावर भाजीबाजार भरत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होऊन छोटे-मोठे अपघात होत आहेत. याबाबत नगरसेवकांनी अनेकदा प्रभाग सभेत हा प्रश्न उपस्थित केला असतानाही परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याचे चित्र बघावयास मिळाले.सिडको प्रशासनाच्या वतीने याठिकाणी भाजीपाला व्यावसायिकांसाठी हक्काची जागी दिली आहे. परंतु अनेक व्यावसायिक हे याठिकाणी व्यवसाय करण्याबरोबरच रस्त्यावरदेखील व्यवसाय थाटत आहेत. येथील मुख्य रस्त्याने वाहन चालविणेदेखील कठीण होत आहे. व्यवसाय करण्यासाठी मनपाच्या वतीने येथील व्यावसायिकांना स्वतंत्र झोन दिला असतानाही याकडे कानाडोळा करीत सर्रासपणे भाजीपाला तसेच फळविक्रेते हे रस्त्यावरच व्यवसाय करीत असल्याने वाहनधारकांची यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. याबरोबरच दत्त चौक, उपेंद्रनगर, त्रिमूर्ती चौक, संभाजी चौक, कामटवाडे, माउली लॉन्स, अंबड येथील भाजीबाजार याठिकाणीही अशीच परिस्थिती असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.जिजामाता भाजी मार्केट, पवननगरपवननगर येथील जिजामाता भाजी मार्केटमध्ये नागरिकांना याठिकाणी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील मार्केटमध्ये शौचालय नसल्याने अनेकजण हे उघड्यावरच बसत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. तसेच भाजीबाजारालगत असलेल्या मुख्य रस्त्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने त्यापुढे ग्राहक हे त्यांची वाहने लावत असल्याने निम्म्याहून अधिक रस्ता अतिक्रमणात जात असल्याने वाहनधारकांना यातून मार्ग काढणेदेखील कठीण होत आहे. याबरोबरच भाजी मार्केटच्या आतील भागातही व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याचे दिसून आले. भाजी मार्केट परिसरात एका मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात घाण साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Marketबाजारvegetableभाज्याTrafficवाहतूक कोंडी