शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
3
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
4
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
5
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
6
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
7
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
8
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
9
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
10
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
11
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
12
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
13
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
14
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
15
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
16
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
17
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
18
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
19
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
20
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
Daily Top 2Weekly Top 5

तथाकथित पर्यावरणवाद्यांकडून उपद्रव

By admin | Updated: September 7, 2016 00:47 IST

पुनर्रोपणात व्यत्यय : न्यायालयात जाण्याच्या धमक्या

नाशिक : वाढता जनक्षोभ लक्षात घेता गंगापूररोड, पेठरोड आदि ठिकाणी रस्त्यांत अडथळा ठरणाऱ्या वृक्षांच्या पुनर्राेपणाची प्रक्रिया महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू केली असताना तथाकथित पर्यावरणवाद्यांचा उपद्रव वाढल्याने मनपा प्रशासन हैराण झाले आहे. वृक्ष पुनर्राेपणासंबंधी आक्षेप घेत न्यायालयात जाण्याच्या धमक्याही तथाकथित पर्यावरणवाद्यांकडून दिल्या जात असल्याची चर्चा आहे.गंगापूर रोडवर अडथळा ठरणारे २६ वृक्ष अन्यत्र पुनर्रोपित करण्याची प्रक्रिया महापालिकेने गेल्या शनिवारपासून सुरू केली आहे. आतापर्यंत १३ वृक्षांचे पुनर्रोपण आगरटाकळी परिसरात करण्यात आले आहे, तर उर्वरित वृक्ष पुनर्रोपणाची प्रक्रिया वेगात सुरू आहे. गंगापूर रोडवर मधोमध अडथळा ठरणाऱ्या वृक्षांमुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये वृक्ष हटविण्याबाबत आग्रह धरला जात आहे. स्थानिक नगरसेवकांकडूनही त्याबाबत वारंवार महापालिकेत आवाज उठविला जात आहे. दरम्यान, न्यायालयाने काही अटी-शर्तींवर वृक्ष पुनर्रोपणाची व वृक्षतोडीची परवानगी दिल्याने महापालिकेने वाढता जनक्षोभ लक्षात घेता गेल्या शनिवारपासून पुनर्राेपणाची प्रक्रिया हाती घेतली आहे. सदर पुनर्रोपणाची प्रक्रिया ही पुणे विद्यापीठातील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मोकाट यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे. त्यासाठी महापालिकेने कालबद्ध कार्यक्रमही आखला आहे. वृक्षपुनर्रोपणाची प्रक्रिया सुरू असतानाच तथाकथित पर्यावरणवाद्यांनी पुन्हा एकदा मनपाच्या या मोहिमेत व्यत्यय आणण्यास सुरुवात केली आहे. वृक्षपुनर्रोपणाची प्रक्रिया नीट राबविली जात नाही, तज्ज्ञ सल्लागार पुनर्रोपणाच्या वेळी जागेवर थांबत नाही आदि आक्षेप घेत मनपा प्रशासनाला तथाकथित पर्यावरणवादी भंडावून सोडत आहे. या वाढत्या उपद्रवाबरोबरच न्यायालयात जाण्याच्याही धमक्या दिल्या जात असल्याची चर्चा आहे. सदर पर्यावरणवाद्यांबाबत स्थानिक नागरिकांमध्येही वाढता रोष असून, नगरसेवक विलास शिंदे यांनी तर संबंंधित पर्यावरणवाद्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)