शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

आता अनेक ग्रुपवर ‘ओन्ली अ‍ॅडमिन...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:32 IST

निवडणुकांबाबतचा अधिकृत प्रचार शनिवारी सायंकाळी संपुष्टात आल्यानंतर समाज- माध्यमांवरदेखील प्रचार संपुष्टात आलेला दिसला. तरी देखील कुणी समर्थकांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर प्रचाराचे मेसेज किंवा फोटो टाकल्यास किंवा काही वादग्रस्त मजकूर टाकल्यास ते प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये, यास्तव खबरदारीचा उपाय म्हणून अनेक अ‍ॅडमिननी त्यांचे ग्रुप शनिवारपासूनच ‘ओन्ली अ‍ॅडमिन कॅन सेंड द मेसेज’ या मोडवर आणून ठेवले आहेत.

ठळक मुद्देसावधगिरी : निवडणुकीच्या तोंडावर काळजी

नाशिक : निवडणुकांबाबतचा अधिकृत प्रचार शनिवारी सायंकाळी संपुष्टात आल्यानंतर समाज- माध्यमांवरदेखील प्रचार संपुष्टात आलेला दिसला. तरी देखील कुणी समर्थकांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर प्रचाराचे मेसेज किंवा फोटो टाकल्यास किंवा काही वादग्रस्त मजकूर टाकल्यास ते प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये, यास्तव खबरदारीचा उपाय म्हणून अनेक अ‍ॅडमिननी त्यांचे ग्रुप शनिवारपासूनच ‘ओन्ली अ‍ॅडमिन कॅन सेंड द मेसेज’ या मोडवर आणून ठेवले आहेत.निवडणुकीची घोषणा झाल्यापासून समाजमाध्यमांवर उमेदवारांच्या बाजूने आणि प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात अशा प्रचाराचा पाऊस पडत होता. कार्यकर्ते आपापल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी दिवस-रात्र पोस्ट, व्हिडीओ टाकत प्रचारात आघाडीवर होते. त्याशिवाय प्रचाराच्या वॉर रूम आणि उमेदवारांनी नेमलेले समाज माध्यमवीर यांनी अक्षरश: प्रत्येक गु्रपवार रतीब घालणे सुरू केले होते. मतदानाचा दिवस जवळ येऊ लागला, तसा समाज माध्यमांवरील प्रचाराचा धुमाकूळ वाढला होता.जाहीरप्रचाराची मुदत संपल्यानंतर मात्र सोशल माध्यमांवरील प्रचारालाही आळा बसलेला दिसून आला.निवडणुक यंत्रणांनीही याकडे बारकाईने लक्ष ठेवले असल्याने कुणीही याबाबत धाडस केले नाही. तथापि खबरदारीचा उपाय म्हणून व्हॉट्सअ‍ॅप ग्रृपच्या अ‍ॅडमिन्सनी धोका टाळण्यासाठी काळजी घेतलेली दिसून आली.दक्षता घेतलेली बरी!बहुतांश सुजाण नागरिकांनी अखेरच्या दोन दिवसांत प्रचाराची पोस्ट टाकण्याचे टाळले. मात्र, चुकून एखादी प्रचाराची पोस्ट कुणी टाकलीच आणि ते प्रकरण वाढत जाऊन वाद निर्माण झाला तर ते आपल्या अंगलट येण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक अ‍ॅडमिनकडून आता वेळीच दक्षता घेतलेली बरी, असे म्हणत अनेक गु्रप पुढील दोन दिवसांसाठी ओन्ली अ‍ॅडमिनच्या मोडला टाकले गेले आहेत. निवडणुक यंत्रणेने घेतलेल्या काळजीचेच हे यश म्हटले जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Social Mediaसोशल मीडिया