औषधनिर्मितीसाठी आता आॅनलाइन परवाने

By Admin | Updated: August 5, 2014 01:53 IST2014-08-05T01:26:56+5:302014-08-05T01:53:30+5:30

औषधनिर्मितीसाठी आता आॅनलाइन परवाने

Now online licenses for drug production | औषधनिर्मितीसाठी आता आॅनलाइन परवाने

औषधनिर्मितीसाठी आता आॅनलाइन परवाने

 

नाशिक : राज्य शासनाने ई-प्रशासनासाठी पावले उचलली असून, त्यामुळे वर्षाअखेरीस पेपरलेस प्रणाली अस्तित्वात येईल, तसेच औषधनिर्मिती उद्योगासाठी लागणारे विविध परवाने आॅनलाइन देण्यात येणार आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे नूतन सहआयुक्त दुष्यंत भामरे यांनी दिली.
नाशिकमधील ड्रग्ज मॅन्युफॅक्चरर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने भामरे यांच्या समवेत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी भामरे यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने ई-प्रशासन स्वीकारल्याने कामकाजात पारदर्शकता आली आहे. त्याचबरोबर उद्योजकांचा वेळ आणि श्रम वाचत आहेत, असे सांगून भामरे यांनी नजीकच्या काळात सर्व सेवा आॅनलाइन झाल्यानंतर उद्योजकांना त्यांचे आढावा प्रस्ताव आॅनलाइन पाठवता येतील तसेच राज्याराज्यांतील नियमांच्या अंमलबजावणीतील सूर बदलण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष सुधाकर पाठक यांनी त्यांचा सत्कार केला. प्रशासनाच्या बदलांची माहिती औषध निरीक्षक नीलेश गांधी यांनी दिली. यावेळी सहायक आयुक्त प्रमोद कातकाडे, संघटनेचे अध्यक्ष गिरीश दाणी, उपाध्यक्ष जे. एस. गिल्डा, चेतन पटणी, दिलीप पाठक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Now online licenses for drug production