ठेंगोड्यात ऐन दिवाळीत व्यावसायिकांना नोटिसा

By Admin | Updated: October 17, 2014 22:59 IST2014-10-17T22:58:49+5:302014-10-17T22:59:29+5:30

ठेंगोड्यात ऐन दिवाळीत व्यावसायिकांना नोटिसा

Notices to businessmen in Anvil Diwali | ठेंगोड्यात ऐन दिवाळीत व्यावसायिकांना नोटिसा

ठेंगोड्यात ऐन दिवाळीत व्यावसायिकांना नोटिसा

ठेंगोडा : येथील विंचूर-प्रकाशा राज्य महामार्ग क्रमांक ७ वरील रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण काम सध्या सुरू आहे. सदर रस्त्यावरील ठेंगोडा गावाजवळील रस्त्याच्या कडेला विविध व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत; सदर दुकाने काढण्याबाबतच्या नोटिसा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने व्यावसायिकांना देण्यात आल्या आहेत. सदर अतिक्रमण सात दिवसांत स्वत:हून व्यावसायिकांनी काढावे अतिक्रमण न काढल्यास पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात येईल, सरकारी मोहिमेत काढण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात येईल, असेही नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. या नोटिसीमुळे व्यावसायिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. दिवाळीसण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या नोटीसीमुळे व्यावसायिकांमध्ये आपापली रोजीरोटी कशी भागवावी याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)

Web Title: Notices to businessmen in Anvil Diwali