शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

येवला पंचायत समितीतील ‘लेटलतिफांना’ नोटीस

By admin | Updated: March 30, 2017 23:52 IST

येवला : येवला पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांच्या लालफितीचा कारभार व लेटलतिफांचा राष्ट्रवादी पाठोपाठ सत्ताधारी शिवसेनेनेदेखील समाचार घेतला.

येवला : येवला पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांच्या लालफितीचा कारभार व लेटलतिफांचा राष्ट्रवादी पाठोपाठ सत्ताधारी शिवसेनेनेदेखील समाचार घेतला. येवला पंचायत समिती उपसभापती रुपचंद भागवत यांनी गुरुवारी सकाळी १० वाजता थेट पंचायत समितीत बैठक घेऊन २० मिनिटे कर्मचाऱ्यांची वाट बघून पंचायत समितीचे प्रवेशद्वारच बंद केले आणि लेटलतिफांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश गटविकास अधिकारी सुनील आहिरे यांना दिले.बुधवारी राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य मोहन शेलार यांनी स्टिंग आॅपरेशन केले होते. त्यापाठोपाठ गुरुवारी पंचायत समिती उपसभापती सेनेचे रुपचंद भागवत यांनी गुरुवारी सलग स्टिंग आॅपरेशन केल्याने कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. येवला पंचायत समितीतील प्रशासकीय कर्मचाऱ्यांना शिवसेनेचे उपसभापती रुपचंद भागवत यांनी गुरुवारी (दि. ३०) सकाळी १० वाजता अचानक पंचायत समिती कार्यालयाला भेट देऊन १०.२० वाजेपावेतो अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाट पाहून पंचायत समिती कार्यालयाचे दोन्ही गेट बंद करून घेतले. त्यामुळे उशिरा आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. कार्यालयात असलेल्या चतुर्थ श्रेणीचे चार ते पाच कर्मचारी उपस्थित होते. बाकी कर्मचारी गैरहजर आढळले. उपसभापती रुपचंद भागवत यांनी शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, कृषी, ईवद, मनरेगा, सामान्य प्रशासन, समाजकल्याण, बांधकाम विभाग व महिला बालकल्याण विभाग यासह सर्वच खातेनिहाय अधिकारी व कर्मचारी वेळेवर येतात की नाही? हे पाहण्यासाठी अचानक येऊन त्यांनी भेट दिली. त्यांनी प्रत्येक खातेनिहाय कर्मचाऱ्यांचे हजेरी रजिस्टर जमा करून घेतले. (वार्ताहर)