शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Top Marathi News LIVE Updates: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
4
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
5
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
6
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
7
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
8
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
9
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
10
Trisha Krishnan: तृषा कृष्णनने लग्न का केलं नाही? बिजनेसमॅनसोबत झालेला साखरपुडा, लग्नही ठरलेलं, पण...
11
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
12
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
13
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
14
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
15
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
16
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
17
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
18
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
19
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
20
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीचा निर्णय नसबंदीसारखाच

By admin | Updated: January 6, 2017 01:10 IST

शरद पवारांची गुगली : मोदी.. गडी बोलायला हुश्शार, म्हणे, मी राजकारणात आणले !

 नाशिक : मोदी.. गडी बोलायला फार हुशार... म्हणे, पवारांनी बोट धरून मला राजकारणात आणलं. ऐकून म्हटलं मेलो आपण ! भाषण असं ठोकून देतोय की, समोरच्याला वाटतं नक्कीच छाती ५६ इंचाची आहे, असे चिमटे काढत राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आपल्या शैलीत टीका केली. लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडविणारे निर्णय घेतले की जनता मतपेटीतून उत्तर दिल्यावाचून राहत नाही. केंद्र सरकारच्या नोटबंदीचा निर्णयही असाच असून, सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे ही नोटबंदी आहे की नसबंदी हे येणारा काळच ठरवेल, असेही त्यांनी सांगितले.
पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीत शेतकरी मेळाव्यात बोलताना पवार यांनी मोदी सरकारला जोरदार चिमटे काढले. ते म्हणाले, नोटाबंदीची घोषणा करताना ‘५० दिन मुझे दे दो’ असं मोदी म्हणाले होते. पन्नास दिवस उलटून गेले तरी जनतेचे हाल संपलेले नाहीत. आता 'त्यांना कोणत्या चौकात उभं करायचं? कोणता आसूड हाती घ्यायचा. चाबूूक घ्यायचा की आसूड ओढायचा? शिवसेनेचे लोक त्यांचे सहकारी आहेत. काल उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकलं. म्हटलं बाबा तुम्ही सगळे गळ्यात गळे घालणारे लोक आहात. तुम्हीच ठरवा काय ते ! संसदेजवळच्या बँकेत २४ हजार रुपये काढायला माणूस पाठवला तर
१० हजारच मिळाले. तेव्हा आमच्यासारख्या खासदारांची ही गत असेल तर चलनटंचाईने तुम्हाला किती मनस्ताप झाला असेल हे समजण्यासारखे आहे, असे सांगून पवार म्हणाले, सरकारची पुढची पायरी सोनं आहे. आमच्या आई-बहिणींच्या गळ्यात
किती सोनं आहे याची चौकशी करणार आहेत.
म्हणजे आम्ही लोकसभेचे अखेरचे सभासद ठरलो...पुन्हा कधी लोक आम्हाला संसदेत पाठवणार नाहीत. आमचीच अशी दैना झाली म्हणजे काय करायचं? कुणी बोलायचं? पवारांच्या या गुगलीवर एकच हशा पिकला. नोटबंदीवर आज जनता गप्प असली तरी ती मतपेटीतून व्यक्त होईल. काँग्रेस सरकारने आणीबाणीचा घेतलेला निर्णय असाच अंगलट आला होता. पुढे भुईसपाट व्हावे लागले, ही आठवणही पवार यांनी करून दिली.
शेतकऱ्यांच्या मालाला कधी भाव मिळाला तर दिल्लीत त्याची चर्चा होते पण आता तर कुठल्याही पिकाला भाव राहिलेला नाही. खर्चही वसूल होत नाही. शेतीच्या प्रश्नावर केंद्र सरकारने आंधळेपणाची भूमिका घेतली आहे, असा आरोप करून वैतागलेली जनता हा संताप निवडणूकीत दिसून आल्यावाचून राहणार नाही, असेही पवार म्हणाले.
याप्रसंगी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, विनायकराव पाटील, मेळाव्याचे आयोजक माजी आमदार दिलीप बनकर यांनी शेतकरी, कामगार व सर्वसामान्य माणसांच्या व्यथा मांडल्या. व्यासपीठावर आमदार हेमंत टकले, नरहरी झिरवळ, दीपिका चव्हाण, रवींद्र पगार, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यासह विविध मान्यवर उपस्थित होते. मेळाव्यास जिल्हातील कांदा ऊत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)