शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात लसीकरण केलेल्या रुग्णांवर नाही गंभीर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:13 IST

नाशिक : जिल्ह्यात शनिवारी कोविशिल्डच्या लसीकरणास प्रारंभ करण्यात आल्यानंतर दिलेल्या ७४५ लसींपैकी एकाही रुग्णास दुसऱ्या दिवशीदेखील कोणतेही गंभीर दुष्परिणाम ...

नाशिक : जिल्ह्यात शनिवारी कोविशिल्डच्या लसीकरणास प्रारंभ करण्यात आल्यानंतर दिलेल्या ७४५ लसींपैकी एकाही रुग्णास दुसऱ्या दिवशीदेखील कोणतेही गंभीर दुष्परिणाम जाणवले नाहीत.

नाशिक जिल्ह्यात शनिवारी लसीकरण प्रक्रियेच्या प्रारंभाच्या दिवशी १३०० जणांना लस देण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असताना प्रत्यक्षात केवळ ७४५ जणांनीच लस घेतली. लस न घेतलेल्यांमध्ये काहींनी पुढच्या टप्प्यात घेण्याचे कारण देत तर काहींनी प्रकृतीच्या कारणास्तव लस घेण्यास नकार दिला. मात्र, शनिवारी लस दिलेल्या ७४५ आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी केवळ १० जणांना लसीकरणाचा किरकोळ त्रास झाला होता. मात्र, लस दिल्यानंतर संबंधित प्रत्येकाला किमान अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवले जात असल्याने त्याच वेळेत थोडासा त्रास झालेल्यांवर त्वरित उपचार करण्यात आल्याने ते लगेचच सामान्य स्थितीत परतले होते. त्यानंतर रविवारचा संपूर्ण दिवस संबंधितांना स्वत:बाबत दक्ष राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यापैकी किंवा अन्य कुणालाही कोणताही त्रास किंवा रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली नसल्यामुळे या लसीबाबत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसह संपूर्ण समाजात सकारात्मक संदेश पोहोचला आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या पुढील लसीकरणावेळी कर्मचाऱ्यांनी लसीकरण टाळणे, पुढील टप्प्यात करण्याची विनंती करणे किंवा प्रकृतीच्या कारणास्तव लसच टाळण्याचे प्रकार कमी होतील, असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी व्यक्त केला.