शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

निमगाव वाकडा आरोग्य केंद्राला कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 18:54 IST

लासलगाव : चांगल्या उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे अनेक आरोग्य कर्मचारीच आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित झाले आहेत. त्यामुळे आरोग्य कर्मचारी वर्गासह नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांना संसर्ग : उपचारासह लसीकरणाबाबत यंत्रणेपुढे प्रश्नचिन्ह

लासलगाव : चांगल्या उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे अनेक आरोग्य कर्मचारीच आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित झाले आहेत. त्यामुळे आरोग्य कर्मचारी वर्गासह नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत.निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रोज पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून, रुग्णांवर उपचार करणारे आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी बाधित होताना दिसत आहेत. जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण सापडल्यानंतर त्याच्यासह कुटुंबीयांवर निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात यशस्वी उपचार करण्यात आले होते. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत पहिला कोरोना रुग्ण सापडताच पिंपळगावनजिक बरोबरच परिसराची घरोघरी तपासणी प्रभावीपणे राबवली होती. चांगल्या उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव वाकडा आता मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारीच मोठ्या प्रमाणावर बाधित होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंत्रणेच्या चिंता वाढल्या आहेत. आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांची संंख्या कमी झाली आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार व लसीकरण कसे करायचे, हा मोठा प्रश्न आरोग्य यंत्रणेसमोर उभा राहिला आहे. लासलगाव येथील रुग्णांची संख्या सध्या आटोक्यात दिसत आहे; परंतु ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी प्रतिबंधक क्षेत्राची निर्मिती केली असून, सर्व प्रभागात जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली असल्याची माहिती लासलगावचे विकास अधिकारी शरद पाटील यांनी दिली.लिलाव ठरताहेत स्प्रेडर्सलासलगावसह पिंपळगाव बसवंत, निफाड, सायखेडा या ठिकाणी शेतीमालाचे लिलाव मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यामुळे शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होताना दिसून येत आहे. शेतीमालाच्या विक्रीनंतर त्याचे पॅकिंग व मालवाहतूक हे टप्पे पार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कुशल व कुशल मजुरांची गरज भासते, तसेच कांदा खळ्यांवरही काम करणाऱ्या हजारो महिला, पुरुष कामगारांची संख्या मोठी असते. त्यामुळे संसर्ग होऊन रुग्णसंख्येत भर पडत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल