शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

निफाड @ ६

By admin | Updated: January 21, 2016 22:00 IST

निफाड @ ६

निफाड : तालुक्यात गुरुवारी सकाळी तपमानात थोडी वाढ झाल्याने कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्राच्या हवामान केंद्रात ६ अंशांची नोंद करण्यात आली आहे.बुधवारी सकाळी ५.४ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तपमानाची नोंद झाल्याने अवघा निफाड तालुका थंडीने गारठून गेला होता. परंतु गुरुवारी तपमानात काहीशी वाढ होत ६ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. त्यामुळे थंडीचे प्रमाण भरपूर होते. तालुक्यात सकाळ सत्राच्या शाळांना येणारे विद्यार्थी काही प्रमाणात थंडीमुळे उशिरा आले. गुरुवारी सुद्धा सकाळच्यादरम्यान नागरिकांना शेकोट्यांचा आधार घ्यावा लागला. दिवसभरही तालुक्यात गारव्याचे मोठे प्रमाण होते. तपमानात घट होऊन थंडी काही प्रमाणात कमी झाल्याने द्राक्ष उत्पादकांची चिंता कमी झाली आहे. ही थंडी गहू, कांदा उत्पादकांसाठी फायदेशीर ठरत आहे.कोनांबे: सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कोनांबे परिसरात गत चार दिवसांपासून ढगाळ वातावरणासह कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीचा वाढलेला जोर काही पिकांसाठी लाभदायक तर काहींना हानीकारक ठरत असल्यामुळे शेतकऱ्यांची ‘कही खुशी, कही गम’ अशी संमिश्र अवस्था झाली आहे.कोनांबे परिसरात पावसाचे प्रमाण कमी असल्याने विहीरींनी तळ गाठलेला आहे. त्यामुळे लागवड केलेल्या पिकांना पाणी देणे जिकरीचे होत असतांनाच वाढलेल्या थंडीमुळे जमिनीतील आर्द्रतेतही वृध्दी झाली आहे. त्याचा कांदा, लसूण, गहू, हरभरा, ज्वारी या पिकांनाही लाभ होऊन ती जोरदार दिसू लागली आहे. कोनांबे परिसरात द्राक्ष बागांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर आहे. वाढत्या थंडीमुळे द्राक्ष बागायतदारांची तारांबळ उडाली आहे. बदलत्या हवामानामुळे उशिरा छाटणी झालेल्या द्राक्ष बागांवर भुरी, डाऊनी या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. याशिवाय पक्व होत असलेल्या बागांचे मनी तडकण्याचेही प्रमाण वाढण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या बदलत्या हवामानाचा फटका द्राक्ष बागांना बसू नये यासाठी उपाययोजना करताना द्राक्ष बागायतदारांचा आर्थिक खर्च वाढत आहे. गेल्या काही दिवसांत थंडीचा जोर कायम राहिल्याने काही पिकांना फायदा होत असल्याचा आनंद तर काही पिकांचे होत असलेल्या नुकसानीचे दु:ख अशी संमिश्र भावना शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. (वार्ताहर)