शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही गोदाकाठ ठप्पच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:51 IST

सायखेडा : शेतकºयांनी पुकारलेल्या संपाचे परिणाम दुसºया दिवसापासून दिसू लागले आहेत. विविध मागण्यांसाठी गोदाकाठ भागातील शेतकरी संपावर गेले आहेत. त्यामुळे सायखेडा मार्केटमध्ये शुकशुकाट होता.

ठळक मुद्देशेतकरी संप : दूध डेअरी, सायखेडा मार्केट, भाजीपाला विक्र ी बंद उद्रेक होण्याअगोदर सरकारने शेतकºयांचे प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन पावले उचलावीत.

सायखेडा : शेतकºयांनी पुकारलेल्या संपाचे परिणाम दुसºया दिवसापासून दिसू लागले आहेत. विविध मागण्यांसाठी गोदाकाठ भागातील शेतकरी संपावर गेले आहेत. त्यामुळे सायखेडा मार्केटमध्ये शुकशुकाट होता.मागील वर्षी झालेल्या शेतकरी आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या गोदाकाठ भागातील शेतकºयांनी यंदादेखील कडकडीत बंद पाळला आहे. यात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत एकाही शेतकºयाने आपला शेतमाल विक्र ीसाठी बाजार समितीत आणला नाही.दूध उत्पादक शेतकºयांनी दूध संकलन केंद्रात न आणता घरीच ठेवले. त्यामुळे परिसरातील सर्व गावातील दूध संकलन केंदे्र बंद होती.मुबलक पाणी, काळी कसदार जमीन यामुळे उन्हाळ्यातही गोदाकाठ भागात नगदी पिके घेतली जातात. परिसरात भाजीपाला, गाजर, मिरची, पिकांचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. सध्या शेतकरी शेतीमाल तोडणी करण्यात दंग आहे.संप काळात शेतकºयांना चार पैसे मिळण्याची वेळ असूनसुद्धा आपल्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी शेतकºयांनी आपल्या शेतमालावर पाणी सोडून स्वयंस्फूर्तीने संपात सहभाग घेतला आहे. या भागात अमूल, पंचमहाल, गोवर्धन, थोरात, पराग, वारणा, प्रभात आदींच्या दूध संकलन केंद्रांवर दुधाचे अल्प प्रमाणात संकलन झाले. नियमित सुमारे ४५ हजार लिटर दूध संकलन होत असलेल्या डेअरी पॉवरमध्ये शुक्र वारी दोन हजार लिटर, शनिवारी तीन हजार लिटर दूध संकलन झाल्याने, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे भगवान सानप यांनी सांगितले.

शेतकºयांसह व्यावसायिकांनाही या संपाची झळ सहन करावी लागत आहे.मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला बाजारभाव नसल्याने आहे तीच परिस्थिती आहे. त्यामुळे उद्रेक होण्याअगोदर सरकारने शेतकºयांचे प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन पावले उचलावीत.- कैलास डेर्ले, शेतकरी

टॅग्स :Nashikनाशिक