स्वप्ने साकारण्यासाठी परिश्रमाची गरज

By Admin | Updated: January 30, 2016 23:07 IST2016-01-30T22:52:58+5:302016-01-30T23:07:18+5:30

निशिगंधा वाड : काकासाहेब मोगल क्रि केट स्पर्धेचा समारोप

The need for hard work to fulfill dreams | स्वप्ने साकारण्यासाठी परिश्रमाची गरज

स्वप्ने साकारण्यासाठी परिश्रमाची गरज

कसबे सुकेणे : स्पर्धेचे स्वरूप हे अंतर्मुख असावे, स्पर्धात्मक जमान्यात टिकाव धरण्यासाठी प्रत्येकाने मोठी स्वप्ने पाहावी मात्र ते साकारण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे, किक्रे ट स्पर्धाही तशीच आहे. आजची तरुणाई ग्लोबल सिटिजन असल्याचे प्रतिपादन मराठी चित्रपट अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी केले.
स्वर्गीय माजी आमदार काकासाहेब मोगल व कुणाल पाटील यांच्या स्मरणार्थ कसबे सुकेणे येथे घेण्यात आलेल्या सहकारमहर्षी काकासाहेब मोगल चषक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचा रविवारी समारोप झाला. यावेळी डॉ. निशिगंधा वाड बोलत होत्या. यांनी अंतिम सामन्याचा मनमुराद आनंद लुटत सुकेणेकरांशी प्रकट मुलाखतीतून संवाद साधला. रेडियो आरजे भूषण मटकरी यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना निशिगंधा वाड यांनी उत्तरे देत दिवंगत काकासाहेब मोगल यांनी समाजाला आपलं कुटुंब मानून समाजाचं भलं केलं. त्याच्या कार्याला माझा सलाम असल्याचे शेवटी सांगून सुकेणे येथील किक्रे टचा जल्लोष आणि उत्साहाचे कौतुक केले.
प्रारंभी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दिवंगत मालोजीराव मोगल, कुणाल पाटील व रावसाहेब भंडारे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र मोगल यांनी प्रास्ताविक केले. मास्टर एजे गु्रपच्या वतीने ऋ षभ जाधव, प्रमोद मोगल, अजिंक्य मोगल, राहुल जाधव, सचिन मोगल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
कसबे सुकेणेच्या राजेसंभाजी मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत संघांनी सहभाग नोंदविला. समारोप कार्यक्र मास काकासाहेब मोगल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पुंडलिक पाटील, शिर्डीचे आशितोष कोते पाटील, यतीन कदम, बापूसाहेब मोगल, वैशाली मोगल, शेखर शिंदे, सरपंच मनीषा भंडारे, प्रकाश काळे, सिद्धार्थ वनारसे, बाळासाहेब बोराडे, विलास मत्सागर, आनंद भंडारे, सुमीत गांधी, सतीश मोरे आदि मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: The need for hard work to fulfill dreams