शाश्वत प्रयत्न हवे : राजेंद्रसिंह

By Admin | Updated: February 28, 2015 23:41 IST2015-02-28T23:33:54+5:302015-02-28T23:41:55+5:30

शाश्वत प्रयत्न हवे : राजेंद्रसिंह

Need eternal endeavor: Rajendra Singh | शाश्वत प्रयत्न हवे : राजेंद्रसिंह

शाश्वत प्रयत्न हवे : राजेंद्रसिंह

नाशिक : समाजाची सरकारवर अवलंबून राहण्याची मानसिकता वाढीस लागल्यामुळे स्वत: काही करण्याची प्रवृत्तीच लोप पावली आहे़ मात्र यामुळे माणसाचे स्वातंत्र्यही हिरावले गेले असून, तो जेव्हा पर्यावरणाशी नाते जोडेल व प्रत्यक्षात अंमलबजावणी करेल तेव्हाच वसुंधरा सुजलाम् सुफलाम् होईल, असे प्रतिपादन मॅगसेसे पारितोषिक विजेते व जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी केले़
कालिदास कलामंदिरात आयोजित ‘पर्यावरण व कायदे’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्रात नद्यांचे नैसर्गिक स्त्रोत पुनर्भरण विषयावर ते बोलत होते़ राजस्थानातातील सात नद्यांचे पुनरुज्जीवनाची माहिती देऊन शाश्वत पर्यावरण विकासाठी लोकसहभागाचे महत्त्व पटवून दिले़
पर्यावरणतज्ज्ञ डॉ़ नंदकुमार मोघे यांनी देशात धरणे, कालवे याऐवजी नदीजोड प्रकल्प, तसेच शाश्वत विकासाला ग्रीन तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे असल्याचे मोघे यांनी सांगितले़
गुजरात उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अमी अग्निक या बायोडायव्हरसिटीबाबत बोलताना म्हणाल्या की, येत्या तीस वर्षांमध्ये पृथ्वीवरील तपमानात २ डिग्रीने वाढ होईल, असेही अग्निक यांनी सांगितले़ यावेळी चर्चेत अनेक मान्यवरांनी चर्चेत सहभाग घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: Need eternal endeavor: Rajendra Singh