शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीला आत्मपरीक्षणाची गरज

By admin | Updated: February 24, 2017 23:36 IST

शिवसेनेच्या हाती सत्तेची दोरी : ग्रामीण जनतेने भाजपा, कॉंग्रेसला नाकारले

दत्ता महाले : येवलामाजी मंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीचा जोरदार फटका राष्ट्रवादीच्या सत्तास्थानाला बसला. येवला पंचायत समितीवर विविध गणांतील सात जागांवर विजय मिळवत निर्विवाद बहुमत सिद्ध करीत शिवसेनेचा भगवा फडकला. यानिमित्ताने तालुक्यातील जनेतेने राष्ट्रवादीला एकप्रकारे आत्मचिंतनाची गरज असल्याचा स्पष्ट कौल दिला असला तरी ग्रामीण जनेतेने भाजपा आणि कॉँग्रेसलाही नाकारले आहे. सत्तेसाठी पक्षांतर करणाऱ्यांना जनतेने नाकारले.  पंचायत समितीत राष्ट्रवादीला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. जिल्हा परिषदेच्या पाटोदा गटासह अंदरसूल गटातील अशा केवळ दोन जागा राष्ट्रवादीला राखता आल्या. शिवसेनेने नगरसूल, राजापूर आणि मुखेड गटाच्या तीन जागा मोठ्या बहुमताने काबीज केल्या. येवला पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेकडे सत्ता आली आहे. येवला नगरपालिकेच्या अध्यक्षपदाचे दावेदार झालेल्या भाजपासह काँग्रेसला खातेदेखील उघडता आले नाही. बसपासह अन्य अपक्षांचीदेखील वाताहत झाली. यातून शिवसेनेला विकासकामे साधण्याची संधी ग्रामीण जनतेने दिली. अंदरसूलला गटात राष्ट्रवादीचे महेंद्र काले यांचा विजय झाला आणि महेंद्र काले यांचे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे कार्यकर्ते व जनसंपर्क, कामाचा माणूस म्हणून असलेली प्रतिमा आणि राष्ट्रवादीचे नेते मविप्र संचालक अंबादास बनकर यांच्या कार्यकर्त्यांचे मोहळ कामी आले. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत आमदार छगन भुजबळ यांचे निष्ठावंत मकरंद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. परंतु भुजबळ समर्थकांना हे रुचले नाही. महेंद्र काले यांनी थेट खासदार सुप्रिया सुळे यांची सभा घेत आणि वातावरण निर्मिती केली. अंदरसूल गणात शेतकरी संघटनेचे पाठबळ लाभलेल्या शिवसेनेच्या निष्ठावान सर्वसामान्य उमेदवार नम्रता जगताप यांना मतदारांनी स्वीकारले.  पाटोदा गटात सेनेची करपलेली भाकरी मतदारांनी फिरवली आणि सेनेचा गड ढासळला. राष्ट्रवादीचे संजय बनकर विजयी झाले. राष्ट्रवादीचे नेते अंबादास बनकर यांनी सुयोग्य नियोजनामुळे एकहाती गट काबीज झाला. बाजार समिती संचालक संजय बनकर यांना राष्ट्रवादीच्या अंतर्गत गोटात प्रारंभी विरोध झाला. परंतु हा विरोध करणारे पुन्हा दिसले नाहीत. मुखेड गटात प्रारंभीपासून सहकार नेते अंबादास बनकर यांचा प्रभाव आहे. परंतु राष्ट्रवादीच्या तिकीटवाटपात विद्यमान सदस्य बाळासाहेब गुंड यांचा मुखेड गटातील हटवाद त्यांना पराभूत करणारा ठरला. मोहन शेलार यांना धुळगाव गणात कामाची पावती मिळाली तर मेंगाणे यांना बनकर यांची साथ महत्त्वाची ठरली.  नगरसूल गटात सविता पवार यांचा विजय निश्चित होता. केवळ त्यांच्या मतांची आघाडी हा चर्चेचा विषय होता. नगरसूल गट हा ओबीसी महिला राखीव होता. राष्ट्रवादीला या गटात उमेदवार मिळत नव्हता.  राजापूर गटातून जिल्हा परिषदेसाठी जिल्हा बँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या सौभाग्यवती सुरेखा दराडे यांना आव्हान देण्यासाठी उच्चपदस्थ नोकरीला अल्पविराम देत सोडून भागवत सोनवणे यांनी त्यांच्या पत्नी शकुंतला सोनवणे यांनी या गटातून निवडणूक लढवली आणि लोकांच्या हाती निवडणूक देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत इतिहासाच्या पुनरावृत्तीची अपेक्षा केली. पण ती फोल ठरली. सोनवणे यांच्या निमित्ताने राष्ट्रवादीला लढत देण्यासाठी केवळ उमेदवार मिळाला. आणि निवडणूक चांगली रण केली गेली, एवढीच राष्ट्रवादीची जमेची बाजू आहे. राजापूर गट हा प्रारंभीपासून दराडे यांची साथ करीत आला आहे.मुखेड गटात मतदारांनी संमिश्र कौल दिला. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड यांच्या पत्नी कुसुम गुंड यांना स्वीकारले नाही. त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सेनेच्या नवख्या कमल भाऊसाहेब आहेर यांचा विजय सेनेला सुखावह ठरला आहे. राष्ट्रवादीला कायम साथ देणारा मुखेड गटावर यंदा सेनेने कब्जा केला. उमेदवारी मिळवण्यापासून गुंड यांना संघर्ष करावा लागला. प्रस्थापितांची असणारी नाराजी त्यांना भोवली.  शिवसेनेच्या उमेदवार निश्चितीपासून ते प्रचारापर्यंतच्या सर्व टप्प्यांत महत्त्वाची भूमिका बजावलेले शिवसेना नेते संभाजीराजे पवार आणि जिल्हा बँक संचालक किशोर दराडे यांना तालुक्याने स्वीकारले. नगरसूल आणि राजापूर गटात असणारे नियोजन उत्कृष्ट होते. त्यामुळे पंचायत समितीत सेनेला स्पष्ट बहुमत मिळाले. तालुक्याच्या उर्वरित गट-गणात असे नियोजन मिळाले असते. शिवाय सावरगाव गणात राष्ट्रवादीचा उमेदवार नसताना सेनेला येथे प्रचारासाठी अडकून ठेवण्यात भाग पाडले गेले. सावरगाव गण बिनविरोध झाला असता तर सेनेचे बळ आणखी वाढले असते. निष्ठावांनाना सेनेने उमेदवारी दिली असती तर विरोधी पक्ष शिल्लक राहिला नसता अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांची होती.वारसदारांना संधीशिवसेना नेते संभाजीराजे पवार यांच्या भावजय सविता बाळासाहेब पवार यांना नगरसूल गटातून, राष्ट्रवादीचे नेते अंबादास बनकर यांचे सुपुत्र बाजार समिती संचालक संजय बनकर यांना पाटोदा गटातून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या धर्मपत्नी सुरेखा दराडे यांना राजापूर गटातून मतदारांनी विक्र मी मतांनी विजयी करून दिले. राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड यांनी पक्षांतर करून शिवसेनेत प्रवेश करून पंचायत समिती सदस्य म्हणून प्रवेश केला तर अन्य शिवसेना व राष्ट्रवादीच्या नऊ नवोदित उमेदवारांना मतदारांनी संधी तर जिल्हा परिषद गटातील पाच नवोदित उमेदवारांना जिल्हा परिषदेत पाठविणे पसंत केले.