शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 22:42 IST

नाशिक : पतीसोबत सुरू असलेल्या मालमत्तेच्या वादात पोलीस सहकार्य करीत नसल्याचा आरोप करीत महिलेने गोंधळ घालून पोलिसांना शिवीगाळ करीत विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि़८) सायंकाळच्या सुमारास शहर पोलीस आयुक्तालयात घडली़ रेहाना मुजरीम खान (पार्कशेड अ, पार्कसाइड अपार्टमेंट, वडाळा- पाथर्डी रोड, इंदिरानगर, नाशिक) असे या महिलेचे ...

ठळक मुद्देपतीसोबत मालमत्तेचा वादपोलीस सहकार्य करीत नसल्याचा आरोपइंदिरानगरमधील महिला, नातेवाइकांसह गोंधळमहिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

नाशिक : पतीसोबत सुरू असलेल्या मालमत्तेच्या वादात पोलीस सहकार्य करीत नसल्याचा आरोप करीत महिलेने गोंधळ घालून पोलिसांना शिवीगाळ करीत विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि़८) सायंकाळच्या सुमारास शहर पोलीस आयुक्तालयात घडली़ रेहाना मुजरीम खान (पार्कशेड अ, पार्कसाइड अपार्टमेंट, वडाळा- पाथर्डी रोड, इंदिरानगर, नाशिक) असे या महिलेचे नाव आहे़ या महिलेस उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तिच्यावर उपचार सुरू आहेत़ दरम्यान, पोलिसांनी गोंधळ घालणाºया नातेवाइकांना ताब्यात घेतले आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेहाना खान या महिलेचे पती मुजरीम खानसमवेत मालमत्तेवरून वाद सुरू आहेत़ तिचा पती तिच्यासोबत राहत नसून या प्रकरणात पोलिसांनी मदत करून मालमत्ता मिळवून द्यावी, अशी रेहाना व तिच्या नातेवाइकांची मागणी असून, यासाठी ते दुपारी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गेले होते़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलदास भोये यांनी हा दिवाणी दावा असून, न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला़ यामुळे रेहाना व तिच्या नातेवाईक दाद मागण्यासाठी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलीस आयुक्तालयात पोहोचले़पोलीस आयुक्तालयातील दुसºया मजल्यावर पोलीस अधिकाºयांची बैठक सुरू असल्याने त्यांना बसण्यास सांगण्यात आले़ याचा राग आल्याने नातेवाइकांनी पोलिसांना शिवीगाळ करीत गोंधळ घातला व दुसºया मजल्यावर पोहोचले़ दरम्यान, या काळातच रेहाना खान या महिलेने विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला़ यामुळे पोलीस आयुक्तालयात एकच गोंधळ उडाला व पोलिसांनी नातेवाइकांना ताब्यात घेत विषारी औषध प्राशन केलेल्या रेहाना हिस इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक बेल्हेकर यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले़--कोट--पोलीस आयुक्तालयात गोंधळ घालणारे रेहाना खानचे नातेवाईक यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर दंगल व सरकारी कामात अडथळा आणल्याचा तर रेहाना खानवर आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल केला जाणार आहे़- डॉ़ राजू भुजबळ, सहायक पोलीस आयुक्त, नाशिक