नाशिकला विवाह समारंभातून वधूच्या सव्वापाच लाखांच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 15:45 IST2018-02-07T15:35:37+5:302018-02-07T15:45:11+5:30

नाशिक : विवाह समारंभातून वधूचे सव्वापाच लाख रुपये किमतीचे २७ तोळे वजनाचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गंगापूर रोडवरील लक्ष्मीनारायण बँक्वेट हॉलमध्ये सोमवारी (दि़५) दुपारी घडली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Nashik,wedding,ceremony,jewelery,Theft | नाशिकला विवाह समारंभातून वधूच्या सव्वापाच लाखांच्या दागिन्यांची चोरी

नाशिकला विवाह समारंभातून वधूच्या सव्वापाच लाखांच्या दागिन्यांची चोरी

ठळक मुद्देगंगापूर रोड : २७ तोळ्याचे दागिनेपोलिसांत गुन्हा दाखल

नाशिक : विवाह समारंभातून वधूचे सव्वापाच लाख रुपये किमतीचे २७ तोळे वजनाचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गंगापूर रोडवरील लक्ष्मीनारायण बँक्वेट हॉलमध्ये सोमवारी (दि़५) दुपारी घडली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात प्रियंका प्रशांत शहाणे (रा़९०६, सोनार बिल्डिंग, वडनेर रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मोठी मुलगी स्रेहल हिचा विवाह टागोरनगरमधील भूषण कुलथे यांच्यासोबत सोमवारी(दि़५) गंगापूर रोडवरील लक्ष्मीनारायण बँक्वेट हॉलमध्ये झाला़ शहाणे तसेच वरपक्षाकडील कुलथे यांनी वधुसाठी बनविलेले सोन्याचे दागिणे विवाहाप्रसंगी घालावयाचे होते़ सकाळी आठ वाजता मंगल कार्यालयात वधू व वरपक्षासह वºहाडी मंडळीही आली होती़ वधूसाठी देण्यात आलेल्या कक्षामध्ये कपडे, भेटवस्तू, बॅग तसेच सोन्याचे दागिने असलेली काळ्या रंगाची पर्स आदी सामान ठेवण्यात आले होते़

हळदी समारंभ दुपारी आटोपल्यानंतर दागिण्यांची पर्स शहाणे यांनी आपली आई भागिरथी नागरे यांच्याकडे दिली होती़ सायंकाळी पाच वाजता वधूला दागिने हवे असल्याने त्यांनी आईकडे पर्स मागीतली असता त्यांच्या मोलकरणीने पर्स रुममधील बेडवर असल्याचे सांगितले़
प्रियंका शहाणे यांनी रुममध्ये जाऊन पर्सची तपासणी केली असता त्यामधील दागिण्यांची चोरी झाल्याचे आढळून आले़

या पर्समध्ये ६४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या रिंगा, ७ ग्रॅमची बिंदी, १२ ग्रॅमचे सोन्याचे बाजुबंद, ६१ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, ११६ ग्रॅम वजनाचा सोन्याचा चपलाहार असे ५ लाख २७ हजार रुपये किमतीचे २७ तोळ्याचे दागिने होते़ दागिने चोरीला गेल्याची माहिती त्यांनी पतीला सांगताच त्यांनी गंगापूर पोलीस ठाण्यास माहिती दिली़

Web Title: Nashik,wedding,ceremony,jewelery,Theft