शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या उपाययोजनांची सीईओंकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 14:59 IST

नाशिक : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विविध उपाययोजना सुरु असताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ...

ठळक मुद्देकोरोना नियोजन: सोशल डिस्टनिंग, स्वछतेबाबत मार्गदर्शन

नाशिक : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विविध उपाययोजना सुरु असताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी मंगळवारी पेठ तालुक्याला भेट दिली पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतींना भेट देवून त्यांनी कोरोनाबाबत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला.कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने दिलेल्या सर्व निर्देशांची अंमलबजावणी करतानाच ग्रामीण भागात कोणताही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. या संकटकाळात ग्रामपंचायत स्तरावर काम करीत असलेल्या सर्व कर्मचारीवर्गाचे त्यांनी कौतूक करून स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.ग्रामीण पातळीवर या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध उपाययोजना करण्यात येत असून याचा जिलहास्तरावरुन दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर आरोग्य कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून जिल्हास्तरावर यासाठी ८ अधिका-यांची नियुक्ती करुन विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी पंचायत समिती पेठ येथे भेट देवून गट विकास अधिकारी,तालुका वैद्यकीय अधिकारी , बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची एकत्रित तयारी व करत असलेल्या कार्यवाही बाबत आढावा घेतला. तसेच ग्राम पंचायत भूवन येथे ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी केंद्राला तसेच धानपाडा ग्राम पंचायतला भेट दिली. यावेळी त्यांनी अमृत आहार वाटप व तयारी तसेच कोरोना जनजागृती बाबत सर्व ग्रामस्तरीय कर्मचा-यांचे कौतुक केले.

 

 

टॅग्स :Nashikनाशिकzpजिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्या