शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पाप्या शेरगील खूनातील संशयित पवारचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 23:27 IST

नाशिक : पेठरोड परिसरातील सराईत बालगुन्हेगार हृतिक ऊर्फ पाप्या राजू शेरगिल याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ हरीश ऊर्फ हºया शेरगिल याने आपल्या सहा साथीदारांसमवेत १९ आॅगस्ट रोजी खुनातील प्रमुख संशयित चेतन संजय पवार (१७, शनिमंदिराशेजारी, पेठरोड, नाशिक) याच्यावर तिबेटीयन मार्केटमध्ये प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती़ यामध्ये गंभीर जखमी ...

ठळक मुद्देतिबेटीयन मार्केट हल्ला ; उपचारादरम्यान मृत्यूचार संशयितांवर होणार खुनाचा गुन्हा दाखल

नाशिक : पेठरोड परिसरातील सराईत बालगुन्हेगार हृतिक ऊर्फ पाप्या राजू शेरगिल याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ हरीश ऊर्फ हºया शेरगिल याने आपल्या सहा साथीदारांसमवेत १९ आॅगस्ट रोजी खुनातील प्रमुख संशयित चेतन संजय पवार (१७, शनिमंदिराशेजारी, पेठरोड, नाशिक) याच्यावर तिबेटीयन मार्केटमध्ये प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती़ यामध्ये गंभीर जखमी पवारचा उपचारादरम्यान गुरुवारी (दि़७) मृत्यू झाला असून शुक्रवारी (दि़८)पोलीस बंदोबस्तात पवारवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़७ फेबु्रवारी २०१७ रोजी पेठरोडवरील मोती सुपर मार्केटजवळ पाप्या शेरगिल याचा खून करण्यात आला़ या खुनातील प्रमुख संशयित चेतन पवार याची शनिवारी (दि़१९ आॅगस्ट) उंटवाडीतील बाल न्याय मंडळात तारीख होती़ त्यासाठी पवार हा आपल्या आई-वडिलांसमवेत तारखेसाठी हजर होता़ यानंतर तिबेटीयन मार्केटमध्ये कपडे खरेदीसाठी गेलेल्या चेतन पवार याच्या मागावर असलेले संशयित विक्की बाळू जाधव ऊर्फ काळ्या तोतरा, पाप्याचा भाऊ हरीश ऊर्फ हºया शेरगिल, रोहन अहिरे, राकेश पवार, गौतम ताठे, ललित ऊर्फ लल्या सुरेश राऊत व अजय भईटा या संशयितांनी चाकू, कोयता व चॉपरने डोके व पाठीवर वार केले़या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या चेतन पवार यास प्रथम जिल्हा रुग्णालय व त्यानंतर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे़ दरम्यान या प्रकरणी पुर्वी सरकारवाडा पोलिसांनी संजय रामलाल पवार यांच्या फिर्यादीनुसार जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही दाखल केला आहे़ यामध्ये आता खूनाच्या गुन्ह्याचे कलम वाढविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़