मखमलाबाद रोडवर भरधाव चारचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 21:58 IST2018-07-09T21:55:48+5:302018-07-09T21:58:23+5:30
नाशिक : भरधाव चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.९) दुपारच्या सुमारास मखमलाबाद रोडवरील लीलावती हॉस्पिटल जवळील मंडलिक मळ्यासमोर घडली. रामचंद्र वाळीबा कातकाडे (५५, रा. नवनाथनगर, पंचवटी) असे मृत्यू झालेल्या इसमाचे आहे.

मखमलाबाद रोडवर भरधाव चारचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू
नाशिक : भरधाव चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.९) दुपारच्या सुमारास मखमलाबाद रोडवरील लीलावती हॉस्पिटल जवळील मंडलिक मळ्यासमोर घडली. रामचंद्र वाळीबा कातकाडे (५५, रा. नवनाथनगर, पंचवटी) असे मृत्यू झालेल्या इसमाचे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोन वाजेच्या सुमारास रामचंद्र कातकाडे हे मंडलिक मळ्यासमोरून पायी जात असताना भरधाव चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. यामध्ये त्यांचे डोके व तोंडास जबर मार लागल्याने त्यांना १०८ रुग्णवाहिकेतील डॉ़ जयश्री गांगोडे यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ़ राहुल पाटील यांनी तपासून मयत घोषित केले.
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चारचाकी वाहनचालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़