शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
2
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
3
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
5
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
6
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
7
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
8
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
9
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
10
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
11
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
12
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
13
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
14
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
15
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
16
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
17
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
18
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
19
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
20
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक बांधिलकीसाठी धावले नाशिककर

By admin | Updated: January 15, 2017 00:56 IST

नाशिक रन : सुजलाम् सुफलाम्चा संदेश; विविध वयोगटातील नागरिकांचा उपक्रमात सहभाग

नाशिक : ‘रन नाशिक रन’, ‘रेडी स्टेडी गो’ अशा घोषणांसह पिस्ता रंगाचा टी शर्ट परिधान करून हजारो नाशिककर समाजसेवेच्या हेतूने शनिवारी (दि.१४) ‘नाशिक रन’ या उपक्रमात धावले. सकाळच्या गुलाबी थंडीत आणि उगवत्या तांबूस रंगाच्या सूर्याेदयाच्या साक्षीने विविध वयोगटातील नाशिककरांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
त्र्यंबकरोड येथील महात्मानगर मैदानापासून शनिवारी सकाळी साडेसात वाजता या रनला महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते झेंडा दाखवून मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत विविध वयोगटातून नागरिक या रनमध्ये सहभागी झाले होते. शहरातील विविध शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, औद्योगिक क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग, महिला यांच्यासह विशेष विद्यार्थी आणि नागरिकांनी या रनमध्ये सहभाग नोंदवला होता.
महात्मानगर मैदानापासून सुरू झालेल्या या रनमध्ये सर्वसामान्यांसाठी ४.५ कि.मी., लहान मुलांसाठी २.५ कि.मी. आणि विशेष नागरिकांसाठीचा मार्ग असे तीन प्रकारचे मार्ग निश्चित करण्यात आले होते. महात्मानगर मैदान, पारिजातनगर, भोसला महाविद्यालय, जेहान सर्कल, स्वामी समर्थ मंदिर चौक, कृषीनगर, समर्थनगर आणि पारिजातनगर मार्गे पुन्हा महात्मानगर मैदान येथे या रनचा समारोप करण्यात आला. यावर्षी घेण्यात आलेल्या नाशिक रनचे हे पंधरावे वर्ष होते. कुठल्याही प्रकारची स्पर्धा नसलेल्या या रनमध्ये केवळ सामाजिक दायित्व या हेतूने विक्री झालेल्या टी शर्टमधून संकलित झालेला निधी सामाजिक कार्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे नाशिकरनच्या वतीने सांगण्यात आले. रन पूर्ण झाल्यानंतर या उपक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी जमा केलेल्या कूपनची सोडत काढण्यात आली आणि सोडतीतून १४ भाग्यवंत नागरिकांना आकर्षक पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच नाशिक रनचे हस्तांतरण नाशिक रनचे अध्यक्ष एच. एस. बॅनर्जी यांनी टीडीके इपकॉसकडून बॉशच्या एच. बी. थॉन्टेश यांच्याकडे सुपूर्द केले.
आंतरराष्ट्रीय धावपटू तसेच आॅलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी धावपटू कविता राऊत, मोनिका आथरे, ताई बामणे, प्रशिक्षक विजेंदर सिंग यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून या रनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महापौर अशोक मुर्तडक, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, नाशिक रनचे संस्थापकीय विश्वस्त आणि बॉश इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौमित्र भट्टाचार्य, बॉश इंडियाचे कार्यकारी संचालक अ‍ॅण्ड्रेस वोल्फ, नाशिक रनचे संस्थापकीय विश्वस्त आणि टीडीके इपकॉसचे व्यवस्थापकीय संचालक एन. बालाकृष्णन, नाशिक रनचे माजी विश्वस्त एस. एम. हेगडे, बॉश इंडिया डिझेल सिस्टमचे श्रीनिवास कु मार, नाशिक रनचे अध्यक्ष आणि टीडीके इपकॉसचे कार्यकारी अध्यक्ष एच. एस. बॅनर्जी, नाशिक रनचे उपाध्यक्ष आणि बॉश नाशिकचे एच. बी. थॉन्टेश, नाशिक रनचे उपाध्यक्ष आणि बॉश नाशिकचे उपाध्यक्ष अविनाश चिंतावर, बॉशचे मनुष्यबळ महाव्यवस्थापक मुकुंद भट, नाशिक रनचे सचिव आणि टीडीके इप्कॉसचे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक अनिल दैठणकर, नाशिक रनचे खजिनदार राजाराम कासार, विश्वस्त सुधीर येवलेकर आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन अतुल नारंग आणि शिल्पा भेंडे यांनी केले. (प्रतिनिधी)‘