शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

दरोडा, लुटमारीतील सहा जणांच्या टोळक्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 22:49 IST

नाशिक : शहरात दरोडा तसेच लुटमार करणाºया टोळीतील सहा संशयितांच्या मुसक्या आवळण्यास शहर गुन्हे शाखेस यश आले आहे़ गुन्हे शाखेच्या युनिट एकने संशयित पवन राजेंद्र वाडेकर (२५, रा. गुरुकृपा हाइट्स, हिरावाडी), वीरेंद्र ऊर्फ बिºया यशपाल शर्मा (३२, रा. पत्रागल्ली, भारतनगर), अजीज ऊर्फ भय्या इशाक शहा (३०, रा. सावित्रीबाई फुलेनगर, वडाळा),आसीफ ...

ठळक मुद्दे दरोडा तसेच लुटमार करणारी टोळी२ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त गुन्हे शाखेच्या युनिट एकने आवळल्या मुसक्या

नाशिक : शहरात दरोडा तसेच लुटमार करणाºया टोळीतील सहा संशयितांच्या मुसक्या आवळण्यास शहर गुन्हे शाखेस यश आले आहे़ गुन्हे शाखेच्या युनिट एकने संशयित पवन राजेंद्र वाडेकर (२५, रा. गुरुकृपा हाइट्स, हिरावाडी), वीरेंद्र ऊर्फ बिºया यशपाल शर्मा (३२, रा. पत्रागल्ली, भारतनगर), अजीज ऊर्फ भय्या इशाक शहा (३०, रा. सावित्रीबाई फुलेनगर, वडाळा),आसीफ रज्जाक सैयद (रा. अशोकामार्ग), शादाब सलीम पिरजादे (२३, रा. ममतानगर, अशोकामार्ग), अमीर यामीन ऊर्फ सत्त्या अन्सारी (२५, रा. नानावली, अमरधामरोड, भद्रकाली), या सहा संशयितांना अटक केली आहे़शहरातील दरोडा तसेच लुटमार प्रकरणातील संशयित द्वारका सर्कलवर येणार असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे व सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे यांना मिळाली होती़ त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक एन. एन. मोहिते, सचिन खैरनार, दीपक गिरमे, भीमराव गायकवाड, चंद्रकांत पळशीकर, जाकीर शेख, संजय पाठक, पोपट करवाळ, वसंत पांडव, संजय मुळक, रवींद्र बागुल यांनी सापळा रचला़ संशयित पवन वाडेकर हा द्वारका हॉटेलजवळ येताच त्यास ताब्यात घेण्यात आले़ पोलिसी स्टाइलने वाडेकरची चौकशी केल्यानंतर त्याने दरोडा व लुटमारीच्या गुन्ह्यांची कबुली देत आपल्या साथीदारांची नावे सांगितली.वाडेकर व त्याच्या पाच साथीदारांना ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्यात वापरलेली अ‍ॅक्टिवा दुचाकी, दीड लाख रुपयांची रोकड, लुटमारीच्या पैशातून खरेदी केलेले कूलर, सायकल, मोबाइल फोन, मोपेड असा २ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला़ पोलिसांनी या संशयितांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत़