शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक शेलार यांच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 23:04 IST

नाशिक : सार्वत्रिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनिप्रदूषणाच्या आदेशाच्या उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन शेलार यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावर शुक्रवारी (दि़ ८) युक्तिवाद झाला़ या जामीन अर्जावर न्यायालय सोमवारी निर्णय देणार आहे़ दरम्यान, दंडे हनुमान मित्रमंडळाचे पदाधिकारी बबलू शेलार यांचा न्यायालयाने ...

ठळक मुद्देसार्वत्रिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकसर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनिप्रदूषणाच्या आदेशाच्या उल्लंघन

नाशिक : सार्वत्रिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनिप्रदूषणाच्या आदेशाच्या उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन शेलार यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावर शुक्रवारी (दि़ ८) युक्तिवाद झाला़ या जामीन अर्जावर न्यायालय सोमवारी निर्णय देणार आहे़ दरम्यान, दंडे हनुमान मित्रमंडळाचे पदाधिकारी बबलू शेलार यांचा न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला असून, भद्रकाली पोलिसांनंतर सरकारवाडा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे़

शहरातील सार्वत्रिक गणेशोत्सव मिरवणुकीत नगरसेवक गजानन शेलार संस्थापक अध्यक्ष असलेल्या दंडे हनुमान मित्रमंडळाने सर्वोच्च न्यायालय व पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करून क्षमतेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजवून ध्वनिप्रदूषण केले़ या प्रकरणी भद्रकाली व सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात ध्वनिप्रदूषण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या प्रकरणी बबलू शेलार यांना भद्रकाली पोलिसांनी अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर केला़ यानंतर सरकारवाडा पोलिसांनी अटक केली़दरम्यान, या प्रकरणी नगरसेवक गजानन शेलार यांच्यावरही गुन्हा दाखल असून, त्यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता़ यावर शुक्रवारी न्यायालयात युक्तिवाद झाला व त्यावर सोमवारी (दि़ ११) निर्णय होणार आहे़