नाशकात महिलेचा रस्ता अडवून विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 17:37 IST2020-06-26T17:32:33+5:302020-06-26T17:37:22+5:30

गंगापूरनाका सिग्नल ते अशोकस्तंभ येथील गुरांचा दवाखाना यादरम्यान महिलेचा पाठलाग करून तसेच रस्ता अडवूून विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. पीडित महिला तिच्या भावासोबत मांजरीला घेऊन मोपेड दुचाकीवरून जात असताना आरोपीने दुचाकीवरून पीडितेचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवून विनयभंग केला.

In Nashik, a woman's road was blocked and molested | नाशकात महिलेचा रस्ता अडवून विनयभंग

नाशकात महिलेचा रस्ता अडवून विनयभंग

ठळक मुद्देदुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा विनयभंग सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : गंगापूरनाका सिग्नल ते अशोकस्तंभ येथील गुरांचा दवाखाना यादरम्यान महिलेचा पाठलाग करून तसेच रस्ता अडवूून विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मखमलाबादच्या शांतीनगर येथील संशयित गणेश जाधव (२३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
पीडित महिला तिच्या भावासोबत मांजरीला घेऊन मोपेड दुचाकीवरून मुंबईनाका सिग्नलकडून अशोकस्तंभ येथील गुरांच्या दवाखान्याकडे जात असताना आरोपी गणेश जाधव याने दुचाकीवरून पीडितेचा पाठलाग करून तिचा रस्ताही अडवला. तसेच प्रेमाच्या विनवण्या करून गुरांचा दवाखाना येथे पीडितेचा हात पकडून बळजबरीने गाडीवर बसविण्याचा प्रयत्न केला. पीडितेने प्रतिकार केला असताना आरोपीने तिला मिठीमारून विनयभंग केला. याप्रकरणी पीडितेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, गणेश जाधव याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड या प्रकरणाचा तपास करीत आहेत. 

Web Title: In Nashik, a woman's road was blocked and molested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.