शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोडला कैद्याची पोलिसाला मारहाण

By admin | Updated: January 15, 2015 23:58 IST

पळण्याचा प्रयत्न फसला : पत्र्याने केला हल्ला

 नाशिकरोड : नाशिकरोड न्यायालयातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कैद्याला पकडल्यानंतर त्याने पकडणाऱ्या पोलिसाला शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी इतर उपस्थित पोलीस मदतीला न धावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी विजयकुमार अनंतकुमार रॉय याला काही दिवसांपूर्वी वैद्यकीय तपासणी करून पुन्हा कारागृहात दाखल करण्यासाठी आणण्यात आले. यावेळी कैदी विजयकुमार रॉय याने कारागृहाच्या प्रवेशद्वारावर देसाई नावाच्या कॉन्स्टेबलवर पत्र्याच्या तुकड्याने हल्ला करून जखमी केले होते. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यासंदर्भात सुनावणीसाठी आरोपी विजयकुमार रॉय याला गुरुवारी दुपारी नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात आले. गंभीर दुखापतीच्या गुन्ह्याच्या वेळी कैदी पार्टीत असलेले पोलीस मुख्यालयातील कॉन्स्टेबल शिवाजी वारुंगसेदेखील न्यायालयात साक्षीसाठी आले होते.नाशिकरोड न्यायालयाच्या व्हरांड्यात बसलेला आरोपी विजयकुमार रॉय हा सिगारेट पिऊ देण्याची मागणी करत होता. त्याला कैदी पार्टीच्या पोलिसांनी मज्जाव केल्यानंतर तो अचानक उठून पळून जाऊ लागला. यावेळी साक्ष देण्यासाठी आलेला कॉन्स्टेबल शिवाजी वारुंगसे याने त्याला पाठलाग करून न्यायालयाच्या आवारातच पकडले. मात्र त्यानंतर संतापलेल्या विजयकुमार रॉय याने त्याला पकडणारा कॉन्स्टेबल शिवाजी वारुंगसे याला शिवीगाळ करत चांगलीच मारहाण केली. न्यायालयातच सर्वांसमोर हा प्रकार घडला. (प्रतिनिधी)