नाशिकहून शेकडो शेतक-यांचा लाँग मार्च धडकणार मुंबईत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 15:19 IST2018-03-08T15:14:49+5:302018-03-08T15:19:29+5:30

2008 मध्ये तयार करण्यात आलेल्या वन हक्क कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी राज्य किसान सभेच्या वतीनं नाशिकहून शेकडो शेतकाऱ्यांच्या लाँग मार्च काढण्यात आला आहे.

Nashik farmers long march | नाशिकहून शेकडो शेतक-यांचा लाँग मार्च धडकणार मुंबईत 

नाशिकहून शेकडो शेतक-यांचा लाँग मार्च धडकणार मुंबईत 

इगतपुरी - 2008 मध्ये तयार करण्यात आलेल्या वन हक्क कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी राज्य किसान सभेच्या वतीनं नाशिकहून शेकडो शेतकाऱ्यांच्या लाँग मार्च काढण्यात आला आहे. हा मार्च मुंबईत पोहोचल्यानंतर आंदोलक शेतकरी आणि आदिवासी विधी मंडळाला घेराव घालणार आहेत. 2006 मध्ये वन हक्क कायद्यात बदल करण्यात आले आणि त्यानुसार 2008 मध्ये नवीन नियम तयार करण्यात आले. परंतु या नियमांची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही. या नियमानुसार सर्व वन हक्क दावे मान्य करावे, अशी प्रमुख मागणी आहे.

या शिवाय देवस्थान आणि इनामी जमिनी कसणाऱ्यांनाच द्याव्यात, विना अट सर्व शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती द्यावी, वीज बिल माफ करावे, दुष्काळग्रस्त भागात दमण गंगा, नार- पार योजनेचे पाणी द्यावे , स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आहे. कॉ अजित नवले, आमदार जीवा पांडू गावित या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.
 

Web Title: Nashik farmers long march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी