शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारी नाशिक कारखान्यावर अखेर ‘टाच’

By admin | Updated: January 13, 2016 00:08 IST

जिल्हा बॅँकेने केली मालमत्ता जप्त

नाशिक : नाशिक सहकारी साखर कारखान्यावरील थकीत १०७ कोटींच्या वसुलीसाठी मंगळवारी (दि. १२) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या पथकाने अखेर जप्तीची कारवाई केली. या कारवाईत नासाका कार्यक्षेत्रावर जिल्हा बॅँकेचा फलक लावण्यात आला.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने नाशिक सहकारी साखर कारखान्याकडील थकीत १०७ कोटींच्या वसुलीसाठी कारखान्याला यापूर्वी दोनदा कायदेशीर नोटिसा बजावल्या होत्या. मात्र कारखाना सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्याचे पाहून अखेर १६ जणांच्या पथकासह जिल्हा बॅँकेचे एक पथक नाशिक साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यासाठी पळसे येथील कारखान्याच्या (पान ९ वर)कार्यक्षेत्रावर पोहोचले. तेथे तानाजी गायधनी यांच्यासह २५ ते ३० सभासदांनी त्यांना कारखान्याच्या जप्तीबाबत विचारणा करतानाच वसुलीसाठी कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव करू नका. कारण कारखान्यावर कर्ज १०७ कोटींचे असताना प्रत्यक्षात कारखान्याची चल-अचल मालमत्ता सुमारे २२० कोटींची असल्याचे सांगितले. जिल्हा बॅँकेच्या वसुली पथकाने पोलिसांच्या उपस्थितीत पंचासमक्ष कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर जिल्हा बॅँकेचा एक फलक लावत १०७ कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी कारखान्याची चल-अचल मालमत्ता जप्त करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. कारखान्यावर जप्तीची कारवाई झालेली असली तरी प्रत्यक्षात वसुलीसाठी नासाकाच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.(प्रतिनिधी)