शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कर्जवसुलीबाबत नाशिक  जिल्हा बॅँकेचे बुधवारी धोरण ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 15:19 IST

जिल्हा बॅँकेने मार्च अखेरीस बड्या व जुन्या थकाबाकीदार शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीचा तगादा लावला असून, त्यातून वाहन कर्जापोटी ट्रॅक्टर जप्तीची मोहिम सुरू आहे. ऐपतदार शेतकºयांच्या मालमत्तांवर कर्जापोटी बोझा चढविण्याची प्रकीयाही हाती घेण्यात आलाी आहे. बॅँकेला जवळपास २२०० कोटी

ठळक मुद्देकर्जदाराची आत्महत्या : वसुलीवर परिणाम होण्याची शक्यता बुधवारी सर्व संचालकांची बैठक

नाशिक : जिल्हा बॅँकच्या कर्जवसुली पथकासमक्ष विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याच्या सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील प्रकारामुळे जिल्हा बॅँक प्रशासन काळजीत पडले असून, अशा घटनांवर मात करण्यासाठी नेमकी काय भुमिका घ्यावी यासाठी बुधवारी संचालक मंडळाची तातडीची बैठक बोलविण्यात आली आहे. सर्वच कर्जदारांनी अशी भूमिका घेतल्यास बॅँकेच्या वसुलीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यताह व्यक्त करण्यात आली आहे.जिल्हा बॅँकेने मार्च अखेरीस बड्या व जुन्या थकाबाकीदार शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीचा तगादा लावला असून, त्यातून वाहन कर्जापोटी ट्रॅक्टर जप्तीची मोहिम सुरू आहे. ऐपतदार शेतक-यांच्या मालमत्तांवर कर्जापोटी बोझा चढविण्याची प्रकीयाही हाती घेण्यात आलाी आहे. बॅँकेला जवळपास २२०० कोटी रूपये मार्च अखेर वसुल करण्याचे आव्हान असून अधिकाधिक कर्ज वसुली केल्यावरच बॅँकेचे गतवैभव प्राप्त होवून गरजू शेतक-यांना पुढील काळात कर्जपुरवठा करणे शक्य होणार आहे. या सर्व पार्श्वभुमीवर सुरू असलेल्या कर्ज वसुली मोहिमेंतर्गंत रविवारी सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे जिल्हा बॅँकेच्या वसुली पथकासमोरच मुकूंद वाजे या कर्जदाराने विषारी औषध सेवन केल्याची घटना घडली. कर्जदाराच्या या पावित्र्याने जिल्हा बॅँकेचे संचालक, कर्मचारी व अधिकारी हादरले असून, अशा घटनेतून कायदेशीर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कर्जदारांना तगादा लावायचा की नाही असा प्रश्न विचारू लागले आहेत. पांढुर्ली येथील घटनेने अन्य कर्जदार देखील त्याच पावलावर पाऊल ठेवून आत्महत्येची धमकी देत वसुलीत खोडा घालण्याचा प्रयत्न करू शकतील अशा परिस्थितीत नेमके काय करावे यावर विचारविनिमय सुरू करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी बुधवारी सर्व संचालकांची बैठक बोलविण्यात आल्याचे सांगितले. कर्जदारांकडून बॅँकेला सहकार्याची गरज असून, वसुल केलेल्या कर्जातून अन्य ठेवीदार शेतक-यांच्या मुला-मुलींचे लग्न, आजारपण आदी कारणासाठी कर्ज दिले जाणार आहे. परंतु जर थकबाकीदारांकडून असे प्रकार होत असतील तर एकप्रकारे ते अन्य गरजू शेतक-यांवर अन्यायकारक ठरणार असून, कर्जवसुलीत आडकाठी आणणा-या थकबाकीदारांबाबत लवकरच जिल्हा बॅँक ठोस धोरण स्विकारणार असल्याचेही केदा अहेर यांनी सांगितले. मुकूंद वाजे यांच्याकडे सन २००६ पासून कर्ज थकले असून, त्यासाठी वेळोवेळी नोटीसाही देण्यात आल्याचे व पुरेसा वेळही दिला गेल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :bankबँकNashikनाशिक