शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी नाशिक ढोलला पसंती

By admin | Updated: September 8, 2016 01:26 IST

ढोल पथके रवाना : मुंबई, ठाणे सार्वजनिक गणेश मंडळांकडून अधिक मागणी

नाशिकरोड : मुंबई-ठाणे परिसरात दीड, तीन, पाच, सात दिवसांच्या घरगुती गणपतीचेदेखील मोठ्या प्रमाणात ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन करण्यात येते. ढोल-ताशांच्या क्षेत्रात मुंबईकरांना पडलेली ‘नाशिक-ढोल’ची भुरळ आजही कायम असल्याने नाशिकमधील अनेक ढोल-ताशाचालक आपल्या वाद्यवृंदासह रवाना झाले आहे.डिजिटल व अत्याधुनिक युगात डीजेची धमाल असली तरी ढोल-ताशांने आजही आपले वेगळेपण व महत्त्व टिकवून ठेवले आहे. ढोल-ताशांच्या क्षेत्रात ‘नाशिक-ढोल’चे वेगळेपण सर्वांनाच मान्य करायला लागते. डीजेच्या काळात बॅँजो पार्टी नावापुरती राहिली. मात्र नाशिकच्या ढोलची वेगवेगळी ताल, ताशाच्या तालावर वाजणारा ढोल, झांजची साथ यावर लहान बाल-गोपाळांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना ठेका धरण्याची इच्छा होते.विविध मंडळांनी आपले ढोल पथक बनविले असून, त्यामध्ये सर्वसामान्य नागरिक, युवक, महिला, युवती, मुले ढोल-ताशा शिकत सामील होतात. एकसारखा गणवेश, ढोल-ताशा वाजविण्याच्या विविध पद्धती, महिलांचा सहभाग, मऱ्हाठमोळापणा यामुळे दिवसेंदिवस ढोल पथक व त्यामध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र मुंबई-ठाण्यात आजही नाशिकमधील जुने ढोल-ताशा पथक यांची मागणी तशीच कायम आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक ढोल-ताशा पथके गणेशोत्सवात दहा दिवस मुंबई-ठाण्यातच राहतात. (प्रतिनिधी)