शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये सकाळी काँग्रेसची मनसेसोबत आघाडी, फोन येताच सायंकाळी घूमजाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 16:07 IST

नाशिकमधील राजकीय घडामोडींमुळे पक्षात राजकारण तापले

Nashik Election: नाशिक महायुतीला आव्हान देण्यासाठी नाशिकमध्ये महाविकास तथा इंडिया आघाडीने मनसे समवेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवण्याचा निर्णय सोमवारी सकाळी घेतला खरा; परंतु त्यावरून राज्यातील काँग्रेसचे राजकारण तापले आहे. बैठकीला उपस्थित राहून मनसेसमवेत आघाडीचे समर्थन करणाऱ्या प्रदेश सरचिटणीस राहुल दिवे यांना तत्काळ नोटीस काढण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतला. प्रवक्ते सचिन सावंत यांनी तर त्यांना पत्रकार परिषद सुरू असताना बाहेर येण्यास सांगितले. दरम्यान, सायंकाळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिवे यांच्यासह अन्य पदाधिकारी जाऊन भेटले त्यांनी मनसे समवेत जाण्याचा कोणताही निर्णय नसल्याचे स्पष्ट केले.

नाशिकमध्ये सोमवारी सकाळी महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला माजी आमदार वसंत गिते, माकपचे डॉ. डी. एल. कराड, मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील तसेच काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. राहुल दिवे, ज्ञानेश्वर गायकवाड उपस्थित होते. या बैठकीनंतर महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र लढणार असल्याचे सांगण्यासाठी पत्रकार परिषद सुरू होताच, काँग्रेसच्या भूमिकेबद्दल चर्चा सुरू झाली. मनसे समवेत न जाण्याचे धोरण अगोदरच काँग्रेस पक्षाने जाहीर केले आहे. त्यामुळे प्रवक्ता सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद सुरू असतानाच अॅड. दिवे यांना फोन केला. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी इंडिया आघाडीतील पक्ष वगळता मनसे समवेत आघाडी होणार नाही, असे सांगून बैठकीस कोणालाही पाठवले नव्हते असे सांगतानाच दिवे यांना नोटीस बजावल्याचे माध्यमांना सांगितले. विजय वडेट्टीवार यांनी स्थानिक पातळीवर परिस्थिती बघून आघाडी होऊ शकते, असे वाहिन्यांना सांगितले.

ते अधिकार वरिष्ठांचेच

प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनीच स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचे अधिकार असल्याचे सांगितले होते असे सांगत अॅड. राहुल दिवे यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले, अर्थात वरिष्ठ पातळीवरून अनुकूलता असेल तरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनीही स्पष्ट केले. दुपारी ४ वाजता संगमनेर येथे दिवे आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यानंतर बाळासाहेब थोरात यांनी मनसेबरोबर जाण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, असे स्पष्ट केले.

जागावाटप कसे होणार? 

मविआमध्ये काँग्रेस पक्षाने मनसेबाबत वेगळी भुमिका घेतल्याने आता जागावाटप आणि पुढील राजकारण कसे होणार याविषयी उत्सुकता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik Congress U-turn on MNS Alliance after Phone Call

Web Summary : Nashik Congress initially agreed to ally with MNS for local elections. However, after a phone call from state leaders, they reversed their decision, causing internal turmoil and prompting explanations from local leaders.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकLocal Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२५Nashik Municipal Corporation Electionनाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६