शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या सांडव्याची दगडी भिंत खचली

By admin | Updated: August 5, 2016 01:04 IST

पाटबंधारे विभागाची आदिवासी जनतेला उडवाउडवीची उत्तरे

 कळवण : उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री सप्तशृंगी निवासिनी देवीच्या सप्तशृंगगडावरील जनतेच्या व देवीभक्तांच्या पाणीप्रश्नाची सोडवणूक करणाऱ्या नांदुरी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या सांडव्यालगत असलेली दगडी भिंत खचल्याने या प्रकल्पालगत असलेल्या चिखलीपाडा येथील आदिवासी जनतेमध्ये कमालीची भीती पसरली असल्याने चिखलीपाड्याला प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.सांडव्याची भिंत खचली या घटनेचे गांभीर्य ओळखून तक्र ार करणार्या आदिवासी जनतेला पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने याप्रश्नी महसूल, आदिवासी व पाटबंधारे विभागाने लक्ष घालावे अशी मागणी नांदुरीचे जगदीश राऊत व ग्रामस्थ यांनी केली आहे . दरम्यान कळवणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी नांदुरी लघुपाटबंधारे प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली असून भिंत खचल्याच्या वृत्तांला दुजोरा दिला आहे. पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेने उडवाउडवीच्या बेजबाबदार विधानाबाबत आदिवासी बांधवांनी आपल्याकडे तक्र ार केली असल्याचे सांगून भिंत खचल्याबाबत संबंधित पाटबंधारे विभागाला तत्काळ लक्ष घालण्याची सूचना केली असल्याचे सांगितले. उर्ध्व गोदावरी प्रकल्प अंतर्गत असलेल्या ६० दशलक्ष घनफूट क्षमतेचा नांदुरी लघुपाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरल्याने सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरु असून दररोज होणार्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असून या लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या सांडव्याची भिंत खचला असल्याचे निदर्शनास आल्याने या भागातील आदिवासी बांधवांनी या प्रकल्पाचे शाखा अभियंता नेटावटे यांना याबाबत कल्पना दिल्याने संबंधित शाखा अभियंत्यांने उडवाउडवीचे उत्तरे देऊन प्रकल्पाच्या भिंतीचे फोटो काढून वृतपत्रात बातमी द्या मग वृतपत्राचे कात्रण करु न प्रस्ताव तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडे पाठवू आण िमंजूरी नंतर भिंत बांधकाम करु असे बेजबाबदार विधाने केली असल्याची तक्र ार आदीवासी बांधवानी केली आहे. (वार्ताहर)