शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटेची शाळा नवीन इमारतीत

By admin | Updated: June 24, 2014 00:35 IST

नांदूरशिंगोटे : येथील प्राथमिक शाळेचे वर्ग अखेर नव्या इमारतीत भरविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे टांगणीला लागलेल्या पालकांचा जीव भांड्यात पडला आहे.

नांदूरशिंगोटे : येथील प्राथमिक शाळेचे वर्ग अखेर नव्या इमारतीत भरविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे टांगणीला लागलेल्या पालकांचा जीव भांड्यात पडला आहे. यापूर्वी शेवटची घटका मोजणाऱ्या व शासनाने निर्लेखित केलेल्या धोकेदायक इमारतीत वर्ग भरविण्यात येत होते. याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठवल्याने प्रशासनाला जाग आली आणि प्राथमिक शाळा नव्या इमारतीत सुरू झाली. ‘नांदूरशिंगोटे येथील विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला’ या मथळ्याखाली लोकमतने प्राथमिक शाळेच्या धोकादायक इमारतीचे वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनाने विद्यार्थ्यांना नव्या इमारतीत बसविण्याचा निर्णय घेतला. बुधवारी लोकमतचे वृत्त प्रसिद्ध होताच येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ शेळके, उपसरपंच गोपाळ शेळके, मुख्याध्यापक एम.के. सोमवंशी आदिंनी नव्या इमारतीची पाहणी करून त्या वर्गखोल्यांच्या स्वच्छतेच्या सूचना करण्यात आल्या. बुधवारीच सर्व वर्ग स्वच्छ झाल्याने गुरुवारी सकाळपासून नव्या इमारतीचा श्रीगणेशा करण्यात आला. यापूर्वीही गटशिक्षणाधिकारी ए.आर. पाटील यांनीही मुख्याध्यापकांना सूचना केली होती.गेल्या तीन वर्षांपूर्वी येथे सर्वशिक्षा अभियानांतर्गत लाखो रुपये खर्चून नवी इमारत उभी करण्यात आली होती. मात्र तरीही ती दुर्लक्षित राहिली. जुन्या इमारतीची उभारणी सन १९५९मध्ये करण्यात आली होती. ती जीर्ण होऊन मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका होता. मात्र असे असतानाही त्याच इमारतीत विद्यार्थी धडे गिरवत होते. याबाबत पालकांनी लक्ष वेधल्यानंतर लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध केल्याने या विषयाला वाचा फोडण्यात आली. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले व गुरुवारी नव्या इमारतीत विद्यार्थ्यांच्या ज्ञानदानाच्या कार्याला मुहूर्त सापडला. जिल्हा परिषदेकडून या नव्या इमारतीसाठी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी बाके मिळाली आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवसाऐवजी तिसरा दिवस खऱ्या अर्थाने फलदायी व आनंदाचा ठरला आहे. (वार्ताहर)