नांदूरकरांचा कडकडीत बंद; मूक मोर्चा

By Admin | Updated: September 16, 2014 00:25 IST2014-09-15T20:52:28+5:302014-09-16T00:25:51+5:30

नांदूरकरांचा कडकडीत बंद; मूक मोर्चा

Nandurkar's crackling turned off; Silent Front | नांदूरकरांचा कडकडीत बंद; मूक मोर्चा

नांदूरकरांचा कडकडीत बंद; मूक मोर्चा


नांदूरशिंगोटे : पावणेचार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून फरार झालेल्या आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी व मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून मूक मोर्चा काढला. यावेळी ग्रामस्थांनी निषेध सभा घेऊन आरोपीला अटक करण्याच्या मागणीचे निवेदन पोलिसांना दिले.
गेल्या शुक्रवारी नांदूरशिंगोटे शिवारात संशयित आरोपी सुदाम रामनाथ शेळके याने पावणेचार वर्षाची बालिकेवर बलात्कार केल्याचा गुन्हा वावी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता. सदर प्रकारानंतर संशयित आरोपी फरार झाला होता. पोलीस याप्रकरणी तीन दिवसांपासून आरोपीचा शोध घेत आहे.
संशयित आरोपीला अटक करण्यात यावी व सदर घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी सकाळी ८ वाजता ग्रामस्थ रेणुका माता मंदिराच्या प्रांगणात एकत्र आले. बाजारतळ, नेहरू चौक, शनिगल्ली, चावडी, अचानक चौक व निमोणनाका यामार्गाने मूूक मोर्चा काढण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ व्यावसायिक व दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली.
ग्रामस्थांनी गावातून मूक मोर्चा काढल्यानंतर रेणुकामाता मंदिराच्या प्रांगणात निषेध सभा घेतली. यावेळी क्रांतिवीर वसंतराव नाईक पतसंस्थेचे उपाध्यक्ष पारब्ध शेळके, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष नानासाहेब शेळके, संघर्ष
गु्रपचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी आपल्या भाषणात सदर घटनेचा निषेध नोंदवून नराधमाच्या अटकेची मागणी केली. पोलिसांनी योग्यरीतीने तपास करून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक ए. सी. बस्ते यांना देण्यात आले.
यावेळी सरपंच अशोक गवारे, उपसरपंच रवींद्र शेळके, ग्रामपंचायत सदस्य गोपाळ शेळके, दीपक बर्के, संदीप शेळके, पी.डी. सानप, विनायक शेळके, शंकर शेळके, कैलास बर्के, रामदास सानप, सूर्यभान पाटील, युवराज शेळके, संचित शेळके, पांडुरंग शेळके, संजय शेळके, दत्ता सानप, सुदाम आव्हाड, राजेंद्र दराडे, भाऊ भाबड, विश्वनाथ शेळके, सागर शेळके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Nandurkar's crackling turned off; Silent Front