शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नानासाहेब पाटील : परप्रांतीय व्यापाऱ्यांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न

By admin | Updated: August 21, 2014 00:14 IST

लासलगाव बाजार समितीत टमाटा लिलावाचा शुभारंभ

लासलगाव : टमाटा उत्पादकांना स्पर्धात्मक वातावरणातून चांगला भाव मिळावा याकरिता लासलगाव येथील टमाटा लिलावातील परप्रांतीय नामवंत व्यापाऱ्यांची संख्या वाढविणार असल्याचे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी सांगितले.बाजार समितीतील टमाटा लिलावाचा शुभारंभ नानासाहेब पाटील यांच्या हस्ते तसेच भाजीपाला मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, माजी सरपंच प्रकाश गांगुर्डे, टमाटा व्यापारी सचिन परदेशी व विष्णू सरोदे यांच्या हस्ते टमाटा क्रेटस्चे पूजन करून केल्यानंतर पिंपळगाव नजीक येथील लहानू सुधाकर भोर यांच्या टमाट्याला ६३० रुपये प्रतिक्रेट्स भाव जाहीर होऊन लिलावास सुरुवात झाली.लवकरच लासलगाव येथील मुख्य आवारावर डाळींब व बेदाणा या शेतीमालाचे लिलाव सुरू करण्याचा बाजार समितीचा प्रयत्न आहे, असे स्पष्ट करून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी टमाटा लिलावानंतर शेतकऱ्यांना लागलीच टमाटा विक्रीचे पैसे देण्यात येणार आहे, असे सांगितले. व्यापाऱ्यांनी परवान्याकरिता तातडीने संपर्क साधावा, असे आवाहनही लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी केले.याप्रसंगी टमाटा व्यापारी बाळासाहेब शेजवळ, हारून शेख, अनिल शेजवळ, शरद हिरे, भगवान सरोदे, प्रभारी हिरालाल सोनारे, सहायक सचिव सुदीन टर्ले, लेखापाल नरेंद्र वाढवणे, सुनील डचके, राजेंद्र पाटील, सुरेश विखे, अशोक गायकवाड, सुशील वाढवणे यांच्यासह परिसरातील टमाटा उत्पादक उपस्थित होते. पहिल्याच दिवशी १११६ क्रेट्समधील टमाट्याला १५१ ते ७०१ रुपये भाव मिळाला. (वार्ताहर)