नामपूर सोसायटी सभापतिपदी नकुल सावंत

By Admin | Updated: August 4, 2014 00:51 IST2014-08-03T20:48:35+5:302014-08-04T00:51:38+5:30

नामपूर सोसायटी सभापतिपदी नकुल सावंत

Nakul Sawant as the Chairman of Nampur Society | नामपूर सोसायटी सभापतिपदी नकुल सावंत

नामपूर सोसायटी सभापतिपदी नकुल सावंत

 द्याने : नामपूर बृहत विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभापतिपदी नकुल सावंत यांची
तर उपसभापतिपदी किशोर सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली.
आवर्तन पद्धतनुसार मावळते सभापती बाजीराव सावंत व उपसभापती अंजनाबाई सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे सदर निवडणूक घेण्यात आली.
या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकेक अर्ज दाखल झाल्यामुळे नकुल सावंत व किशोर सावंत यांची बिनविरोध निवड झाली. गेल्या ५२ वर्षांपासून येथील सोसायटीवर शिक्षक बॅँकेचे माजी विभागीय अध्यक्ष कै. जयवंतराव सावंत गटाची सत्ता आहे.
यावेळी संस्थेचे माजी सभापती अशोक सावंत, राजेंद्र सावंत, अशोक पवार, बाजीराव सावंत, ज्ञानेश्वर मोरे, प्रसाद अलई, सुनील अलई, लक्ष्मण सावंत व नारायण
चव्हाण यांच्यासह सचिव राजेंद दुसाने आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Nakul Sawant as the Chairman of Nampur Society