शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

माझे कुटूंब मोहिमेत सापडले ३४४ कोरोना बाधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 01:33 IST

नाशिक- राज्य शासनाच्या वतीने कोरोना संदर्भात जागृती करण्याबरोबरच घरोघर जाऊन आरोग्य तपासणी करण्यासाठी माझे कुटूब माझी जबाबदारी मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत २ लाख २९ हजार ९१ नागरीकांची तपासणी करण्यात येत आहेत. या मोहिमेत ६०४ संशयित नागरीक आढळले. त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर ३४४ बाधीत रूग्ण आढळले आहे. त्यामुळे ही मोहिम अधिक व्यापक पध्दतीने राबविण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देसर्र्वेक्षण कामाला विरोध कायम

नाशिक- राज्य शासनाच्या वतीने कोरोना संदर्भात जागृती करण्याबरोबरच घरोघर जाऊन आरोग्य तपासणी करण्यासाठी माझे कुटूब माझी जबाबदारी मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत २ लाख २९ हजार ९१ नागरीकांची तपासणी करण्यात येत आहेत. या मोहिमेत ६०४ संशयित नागरीक आढळले. त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर ३४४ बाधीत रूग्ण आढळले आहे. त्यामुळे ही मोहिम अधिक व्यापक पध्दतीने राबविण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत.कोरोनाचा संसर्ग राज्यातील काही भागात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठकारे यांच्या संकल्पनेतून माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिम राबविण्यात येत आहे. नाशिक शहरात महापालिकेच्या वतीने ही मोहिमराबविण्यासाठी सध्या जोरात मोहिम सुरू आहे. या मोहिमेत आरोग्य नियमांची माहिती संबंधीत घरातील नागरीकांची आरोग्य तपासणी केली जात असून रक्तदाब, हृदयरोग, मधूमेह अशा विकार असलेल्यांची माहिती नोदवली जात आहे. त्यांचे समुपदेशन देखील केले जात आहे. तसेच सर्व माहिती माझे कुटूंब अ­ॅपमध्ये संकलीत केली जातआहे. याशिवाय ज्या नागरीकांमध्ये सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे आहेत त्या सर्वांचीच तपासणी केल्यानंतर संशयित रूग्णांची कोरोना चाचणी देखील केली जात आहे. या मोहिमेसाठी महापालिकेच्या वतीने ७९४ पथके तयार केली आहेत.या मोहीमे अंतर्गत ६३२ पथकांनी प्रत्यक्ष कामास प्रारंभ केला असून या मोहीमे अंतर्गत ५५ हजार ४१४ घरांना भेटी देण्यात आल्या आहेत. या घरांमधील २ लाख २९ हजार ९१ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात त्यात कोरोनाचीलक्षणे असलेले ६०४ संशयित आढळले. त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यात ३४४ बाधीत आढळले आहेत.सर्र्वेक्षण कामाला विरोध कायममहापालिकेने घर सर्वेक्षणासाठी ७९४ पथके तयार केली आहेत. मात्र, शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांनी विरोध केला असल्याने पुर्ण क्षमतेने काम सुरू केलेले नाही. सध्या ६३२ पथकेच कार्यरत आहेत. १६२ पथके अद्याप कार्यरतनसून त्यांनी आरोग्य सुरक्षा किट नाही, अ­ॅँड्रॉईड प्रशिक्षण दिलेले नाही अशी वेगवेगळी कारणे दिली आहेत. त्यामुळे महापालिकेने संबंधीतांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. साथ प्रतिबंधक कायदा तसेच आपत्ती व्यवस्थापनकायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा देणा-या नोटिसा सर्वेक्षणास नकार देणाऱ्यांना बजावण्यात आल्या आहेत.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य