शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या पैशाच्या वादातून मालेगावी एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:13 IST

मालेगाव : चोरीच्या पैशांवरून वाद झाल्याने तिघा मित्रांनी धारदार शस्त्राने आणि डोक्यावर दगड मारून मित्र नूर ...

मालेगाव : चोरीच्या पैशांवरून वाद झाल्याने तिघा मित्रांनी धारदार शस्त्राने आणि डोक्यावर दगड मारून मित्र नूर मोहमद रोश मोहमद याचा खून केला. याप्रकरणी पवारवाडी पोलिसानी संशयित आरोपी मोहमद सादिक उर्फ पप्पू आणि मोहमद जुबेर (दोन्ही रा. नवी वस्ती, मालेगाव) यांना ताब्यात घेतले आहे तर शोएब उर्फ सोनू हा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

काल शनिवारी (दि. १७) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास म्हाळदे शिवारात गुलाब बाबा दर्गाजवळ २० ते २२ वर्षे वयाच्या अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला होता. याबाबत पवारवाडी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी आणि उपअधीक्षक लता दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक एन. आर. शेख, हवालदार सुरेश बाविस्कर, सचिन धारणकर, भरत गांगुर्डे, सचिन भामरे, नवनाथ शेलार, राकेश जधव, सोमनाथ डामसे यांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली. हे अनोळखी प्रेत नूर मोहमद रौश मोहमद ( रा. मिल्लतनगर) याचे असल्याचे निष्पन्न झाले. नूर मोहमदच्या मृत्यूबाबत संशय आल्याने दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, चोरीच्या पैशांच्या वादातून तिघांनी नूर मोहमद या मित्राचा खून केल्याचे सांगितले. पवारवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. आर. शेख करत आहेत.