शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अडीचशे कोटींसाठी पालिकेचा निरुत्साह

By admin | Updated: July 21, 2014 01:32 IST

अडीचशे कोटींसाठी पालिकेचा निरुत्साह

 

नाशिक : पालिकेच्या तिजोरीत खडखडाट त्यातच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी शासनाकडून निधी मिळण्याची अपेक्षा नाही, अशा स्थितीत जमेल तिथून निधी मिळवण्याच्या प्रयत्नांची गरज असताना प्रशासनाकडून मात्र तसे होत नाही. जकातीच्या तुलनेत एलबीटीत मिळणारे उत्पन्न कमी झाल्यास त्याची भरपाई राज्य शासन करणार आहे. त्यानुसार पालिकेने २४० कोटी रुपयांचा आकडा निश्चित केला; परंतु अद्याप शासनाकडे प्रस्तावच पाठविला नसल्याचे वृत्त आहे. प्रशासनातील ही उदासीनता हा चर्चेचा विषय ठरला आहे.महापालिकेला जकात वसुलीतून विक्रमी सहाशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाल्यानंतर गेल्या आर्थिक वर्षात उच्चांकी वसुली होईल, असा पालिकेला विश्वास होता; परंतु राज्य शासनाने त्यावर पाणी फेरले. गेल्यावर्षी २१ पासून महापालिका हद्दीत जकात रद्द करून त्याऐवजी एलबीटी लागू करण्यात आला आहे. एलबीटी लागू झाल्यानंतर जकातीच्या तुलनेत घट येईल, असे पालिकांचे म्हणणे असल्याने राज्य शासनाने पहिल्या वर्षी जकात आणि एलबीटी यांच्या उत्पन्नात जी तफावत येईल त्याची भरपाई करण्यात येईल, असे जाहीर केले. अपेक्षेनुसार जकातीच्या तुलनेत पालिकेचे उत्पन्न घटले असून, जकातीची तुलना करता २४० कोटी रुपयांचे नुकसान झाले, असे नाशिक महापालिकेचे म्हणणे आहे.यासंदर्भात राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून निधी मिळवणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र महापालिकेने हालचालच केलेली नाही. यासंदर्भात एलबीटी विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी लेखा विभागाला पत्र दिले आहे, असे सांगतात तर लेखा अधिकारी याबाबत एलबीटी विभागानेच पाठपुरावा केला पाहिजे असे सांगतात. कोणीही निधीचा प्रस्ताव पाठविण्यासही तयार नाही की निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. गेल्या महिन्यात तर एलबीटीची मासिक वसुली इतकी घटली होती की, कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. दुसरीकडे पालिका आपल्या हक्काचे निधी मिळवण्याविषयी अनास्था दाखवत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)