शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

मुखेड-खडकीमाळ रस्त्याचे काम निकृष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 10:53 PM

येवला तालुक्यातील मुखेड रस्त्यावरील मुखेड-खडकीमाळ (मानोरी बुद्रुक) या दोन किलोमीटर रस्त्याच्या अंतराचे नव्याने खडीकरण करून डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. मात्र, सदर रस्त्याचे सुरू असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्र ार मानोरी बुद्रुक व मुखेड येथील नागरिकांनी केली आहे. या कामाचा दर्जा न सुधारल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे ग्रामपंचायत प्रशासनास देण्यात आला आहे.

ठळक मुद्देनागरिकांचा आरोप : दर्जा न सुधारल्यास आंदोलनाचा इशारा

मानोरी : येवला तालुक्यातील मुखेड रस्त्यावरील मुखेड-खडकीमाळ (मानोरी बुद्रुक) या दोन किलोमीटर रस्त्याच्या अंतराचे नव्याने खडीकरण करून डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. मात्र, सदर रस्त्याचे सुरू असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्र ार मानोरी बुद्रुक व मुखेड येथील नागरिकांनी केली आहे. या कामाचा दर्जा न सुधारल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे ग्रामपंचायत प्रशासनास देण्यात आला आहे.सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूला साइडपट्ट्या आणि पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था, गटार करण्यात आलेली नाही, कामात वापरली जाणारी खडीसुद्धा निकृष्ट दर्जाची असून, ही खडी बदलून चांगल्या प्रकारची खडी टाकावी आदी मागण्यांचा निवेदनात उल्लेख आहे. येवला तालुक्यातील मुखेड फाटा येथील नाशिक-औरंगाबाद महामार्गाला मिळणारा हा मुखेड ते मुखेड फाटा पाच किलोमीटर अंतराचा मुख्य रस्ता असल्याने नेहमी वाहनांची वर्दळ असते. मागील पाच ते सात वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था होत चालल्याने या रस्त्याची होणारी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. निवेदनावर सरपंच नंदाराम शेळके, पोलीसपाटील आप्पासाहेब शेळके, शिवसेना नेते छगन आहेर, अनंता आहेर, पोपट शेळके, दत्तू शेळके, श्रावण शेळके, विठ्ठल शेळके, ज्ञानेश्वर शेळके, बाळासाहेब शेळके, संतोष शेळके, भाऊसाहेब शेळके आदींच्या सह्या आहेत.सुमारे १० वर्षांनी या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाला मुहूर्त लागला आहे. त्यात हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुखेड-खडकीमाळ रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच सोमवारी (दि.२४) रस्त्याच्या निकृष्ट असलेल्या कामाचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला तसेच पंचायत समिती उपअभियंता कार्यालयातदेखील देणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा