रब्बीच्या ५७ टक्के क्षेत्रावरील आटोपल्या पेरण्या गहू, हरभरा पिकाचे सर्वाधिक क्षेत्र

By Admin | Updated: December 30, 2014 00:18 IST2014-12-30T00:11:33+5:302014-12-30T00:18:25+5:30

रब्बीच्या ५७ टक्के क्षेत्रावरील आटोपल्या पेरण्या गहू, हरभरा पिकाचे सर्वाधिक क्षेत्र

Most sown area of ​​sowing wheat, granar crop, which came to 57% of Rabi crops | रब्बीच्या ५७ टक्के क्षेत्रावरील आटोपल्या पेरण्या गहू, हरभरा पिकाचे सर्वाधिक क्षेत्र

रब्बीच्या ५७ टक्के क्षेत्रावरील आटोपल्या पेरण्या गहू, हरभरा पिकाचे सर्वाधिक क्षेत्र

नाशिक : जिल्'ात रब्बी हंगामाच्या पेरण्यांना वेग आला असून, एकूण रब्बीच्या १ लाख ३२ हजार ५०० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ७४ हजार ९१७ हेक्टर ( ५६.५४ टक्के) क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्यांची लागवड झाली आहे. अवकाळी पावसाने जिल्'ातील शेतपिकांचे नुकसान झालेले असतानाच रब्बीच्या पेरण्यांना मात्र वेग आला असून, गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या रब्बीच्या पेरण्या सोमवार (दि.२९) अखेर ७४ हजार ९१७ हेक्टर (५६.५४ टक्के) क्षेत्रावर आटोपल्या. जिल्'ात रब्बीचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र १ लाख ३२ हजार ५०० हेक्टर असून, त्यापैकी ७४ हजार ९१७ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्'ात रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र गहू व हरभरा या पिकांचे सर्वाधिक क्षेत्र आहे. रब्बी ज्वारीचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र १० हजार ५०० हेक्टर असून, त्यापैकी ४ हजार ९९७ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीच्या पेरण्या झाल्या आहेत. रब्बी गहू पिकाचे सरासरी क्षेत्र ७६ हजार ७०० हेक्टर असून, त्यापैकी ३७ हजार ९०६ हेक्टर क्षेत्रावर गहू पिकाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. रब्बी मका पिकाचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र २५०० असून, त्यापैकी दोन हजार ०५५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तसेच रब्बी हरभरा पिकाचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ४० हजार ८०० असून, त्यापैकी २८ हजार ९६७ हेक्टर क्षेत्रावर हरभरा लागवड करण्यात आली आहे. जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यांत रब्बी हंगामाच्या ७५ ते ८० टक्के पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Most sown area of ​​sowing wheat, granar crop, which came to 57% of Rabi crops