शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

सकाळच्या सत्रात भाड्यात कपात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 01:12 IST

कालिदास कलामंदिराच्या प्रस्तावित नियमावलीत सकाळ आणि प्रथम सत्र यांना विभागण्यात आले असून, सकाळच्या सत्रातील दरांमध्ये घट करण्यात आली असून, महात्मा फुले कलादालनाचे दर निम्मे करण्यात आले आहेत.

नाशिक : कालिदास कलामंदिराच्या प्रस्तावित नियमावलीत सकाळ आणि प्रथम सत्र यांना विभागण्यात आले असून, सकाळच्या सत्रातील दरांमध्ये घट करण्यात आली असून, महात्मा फुले कलादालनाचे दर निम्मे करण्यात आले आहेत. या प्रस्तावित बदलांना स्थायी समितीसमोर ठेवून त्याला स्थायीची मंजुरी घेतल्यानंतर ही सुधारित दर सूची लागू करण्यात येणार आहे.कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणाला वर्षपूर्ती झाल्यानिमित्त लोकमतने प्रसिद्ध केलेल्या ‘नूतनीकरण अन्् खच्चीकरण’ या वृत्तमालिकेत कालिदासच्या नियमावलीतील त्रुटींवर बोट ठेवण्यात आले होते. तसेच या त्रुटींमुळे रंगकर्मी आणि नाट्य व्यावसायिकांची असलेली नाराजी अधोरेखित करण्यात आली होती. त्यानंतर प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले, सुप्रिया पाठारे आणि विजय पाटकर यांनीदेखील त्रुटींबाबत रोष व्यक्त केल्यानंतर महापालिकेने नियमावलीत सुधारणा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ही प्रस्तावित दर सूची तयार करण्यात आली आहे.सकाळ आणि प्रथम सत्राला वेगळे दर आहेत. यापूर्वीच्या दरसूचीत सकाळ आणि प्रथम सत्राचे दर एकसारखे होते. मात्र नूतन सूचीमध्ये रंगीत तालीम, हौशी बालनाट्य, हौशी नाटक, शासकीय कार्यालयांच्या कार्यशाळा यांचे दर ४५०० वरून ३५०० रुपये करण्यात येणार आहेत, तर व्यावसायिक नाटक, शास्त्रीय गायन, स्थानिक गायक, गझल, मराठी गाण्यांचा कार्यक्रम, नृत्य यासाठी सकाळच्या सत्रातील शुल्क दहा हजार ऐवजी ७५०० रुपये असे अडीच हजार रुपयांनी घटविण्यात आले आहे, तर व्यावसायिक आॅर्केस्ट्रा, कार्यशाळा आणि अन्य कार्यक्रमांबाबतचे सकाळच्या सत्राचे शुल्क २० हजार ऐवजी १४ हजार करण्यात आले आहे.प्रथम, द्वितीय आणि तृतीय सत्रातील दर कायम ठेवण्याचा प्रस्ताव असला तरी त्यातील पहिल्या रांगेतील तिकीट दर आणि अन्य रांगांमधील तिकीट दरातील तफावतीचा मुद्दा स्पष्ट करण्यात आलेला नाही.फुले कलादालनाचे दर निम्म्यावरमहात्मा फुले कलादालनाच्या खालच्या मजल्यावर कलाप्रदर्शन हॉलचे दर २० हजारांवरून १० हजार करण्यात आले आहेत, तर तेथील चर्चासत्र आणि व्याख्यानमालेसाठीचे शुल्क १० हजारांऐवजी ५ हजार करण्यात आले आहे. दिवसा तयारीसाठी दालनाचे भाडे तीन तासांसाठी दोन हजारांऐवजी १ हजार, तर रात्री तयारी किंवा साहित्य ठेवण्यासाठी ५ हजारांऐवजी २५०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे, तर वरील मजल्यावर दिवसा चित्रशिल्प आणि कलाप्रदर्शनाचे दर २० हजारांऐवजी दहा हजार, चर्चासत्र व्याख्यानमालेसाठी ५ हजार रुपये, तर रात्री साहित्य ठेवण्यासाठीचे दर ५ हजारांवरून २५०० हजार करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcultureसांस्कृतिक