शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

सावानात दोनपेक्षा अधिक पॅनलची निर्मिती?

By admin | Updated: March 12, 2017 01:16 IST

निवडणूक : अर्ज विक्री-स्वीकृतीसाठी रीघ; लढत रंगण्याची शक्यता

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारणे आणि दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना शनिवारी (दि. ११) शहरातील साहित्य, कला तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी अर्जांची खरेदी करून या निवडणुकीत तिसरे पॅनल निर्माण होण्याचे संकेत दिले आहेत.शनिवार अखेरीस सार्वजनिक वाचनालयाचे विद्यमान अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी पुढील पंचवार्षिक निवडणुकीसाठीदेखील अध्यक्षपदाच्या अर्जाची खरेदी केली असून, उपाध्यक्षपदासाठी किशोर पाठक, रमेश जुन्नरे आणि कांतिलाल कोठारे यांनी अर्जाची खरेदी केली आहे, तर कार्यकारिणी मंडळासाठी २८ अर्जांची विक्री झाली आहे. शनिवारी कार्यकारिणी मंडळासाठी रमेश जुन्नरे, वेदश्री थिगळे, श्रीकांत बेणी, नंदन रहाणे, अभिजीत बगदे, जयप्रकाश जातेगावकर, शारदा गायकवाड, संजय करंजकर, समीर शेटे यांच्यासह कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांचा समावेश असलेल्या ‘जनस्थान’ या व्हाट््स अ‍ॅप ग्रुपचे सदस्य विनोद राठोेड, मोहन उपासनी, प्रशांत केंदळे, संजय गिते आदिंनी कार्यकारिणी मंडळपदासाठी अर्जांची खरेदी करून या निवडणुकीसाठी वेगळे पॅनल निर्माण करण्याचे संकेत दिले आहेत. जनस्थान ग्रुपच्या सदस्यांनी अर्जाची खरेदी केलेली असली तरी रविवारी (दि. १२) सदस्य एकत्र येत बैठकीतून या निवडणुकीची पुढची दिशा ठरवणार असल्याचे ग्रुपमधील एका सदस्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. १७५ वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीमुळे साहित्य क्षेत्रातील घडामोडींना वेग आला आहे. वाचनालयाच्या विद्यमान कार्यकारिणीतून निलंबित करण्यात आलेले कार्यवाह आपले स्वतंत्र पॅनल निर्माण करण्याची चर्चा होती, परंतु यंदाच्या निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचे मिलिंद जहागिरदार यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले तसेच प्रा. विलास औरंगाबादकर आणि श्रीकांत बेणी यांनी आपापले स्वतंत्र पॅनल तयार करण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू असल्याचे सांगताना पुढील काही दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे सांगितले.वैध उमेदवारांची यादी शुक्रवार (दि. १७) तर उमेदवारांची माघारीनंतरची यादी सोमवारी (दि. २०) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणूकीसाठी अर्ज खरेदी आणि दाखल करण्यासाठी अजून दोन दिवस शिल्लक आहेत. (प्रतिनिधी)